मुंबई : शिवसेनेत (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व बंड झाले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. शिवसेनेत झालेल्या या बंडानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे शिष्य असलेले आणि शिंदे यांचे सहकारी खासदार राजन विचारे (Rajan Vikhre) यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. शिवसेनेत बंड झाल्यानंतर विचारे हे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udddh Thackeray) यांच्या पाठिशी राहिले. मात्र, त्यांनी भाष्य करणे टाळले होते. आता पहिल्यांदाच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आज विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यातील शिवसैनिकांनी 'मातोश्री' येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर विचारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ठाण्याचा बालेकिल्ला हा शिवसेनेचाच असून तो आणखी मजबूत ठेवू हे सांगण्याकरता 'मातोश्री'वर आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेला पहिली सत्ता ठाणेकरांनी दिली होती. ठाणे व शिवसेनेचे नाते आहे. आम्ही ठाण्यातील शिवसैनिक आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे शिवसैनिक असल्याचे त्यांनी सांगितले. आज 'मातोश्री'वर आलेले शिवसैनिक हे स्वत: हून आले आहे. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आम्हीदेखील धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य असल्याचे विचारे यांनी सांगितले. वयाच्या 16 व्या वर्षापासून आपण शिवसेनेत काम करत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात काम केले. मागील 40 वर्षांपासून शिवसेनेसाठी काम केले, असल्याचे विचारे म्हणाले.. शिवसेनेने एका सामान्य माणसाला शाखाप्रमुख, नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार केले आहे. त्याची आठवण असून निष्ठा व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.