Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : चर्चा अजित पवारांची; पण काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या गळाला?

Congress Leader News: विशेष म्हणजे हमखास निवडून येणारा हा नेता आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार अशी चर्चा राज्यात रंगली आहे. पवार यांची चर्चा होत असली तरी काँग्रेसचा (Congress) एक बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हमखास निवडून येणारा हा नेता आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ‘भाजपविरोधात मला एकट्याला लढावं लागेल,’ असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात मोठी राजकीय घडामोडी घडणार हे मात्र निश्चित आहे. (Discussion of Ajit Pawar; But a big leader of Congress is on the way to join BJP)

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरले तर पर्यायी व्यवस्था भाजपकडून केली जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपसोबत जाणार, असे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार यांनी ही अफवा असल्याचे सांगून नागपूरच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला हजेरी लावली होती.

नागपूरहून परतल्यानंतर पवार यांनी सोमवारचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. मात्र, ते मुंबईतच होते. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबाबत भाष्य केले नसले तरी त्यांच्या समर्थनार्थ तीन आमदार उघडपणे मैदानात उतरले आहेत. त्यात पिंपरीचे अण्णा बनसोडे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि दिलीप बनकर यांनी पवारांसोबत जाणार असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

एकीकडे अजित पवार यांची चर्चा सुरू असली तरी भाजपने काँग्रेसचा एक बडा नेता गळाला लावल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधित काँग्रेस नेता हा आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विशेषत: निवडून येण्याच्या निकषावर भाजपने हा नेत्याची निवड केल्याचे समजते. जर निर्णय विरोधात गेला तर काँग्रेसच्या या बड्या नेत्याची मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. काल काँग्रेस नेते वेणुगोपाल हे उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी एका काँग्रेस नेत्याशी बोलताना उद्धव ठाकरेंनी ‘आता मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावे लागणार’ असे विधान केले आहे. तसेच, अगोदर माझ्या पक्षात गद्दारी करवली, आता इतर पक्षात गद्दारी करवतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT