Karad News : काँग्रेसच्या वरिष्ठांशी मतभेद नाहीत; चर्चा झाली तर नाराजी दूर होईल : सत्यजित तांबे

Yashwant Chavan आमदार तांबे यांनी कऱ्हाड (जि.सातारा) येथील जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.
Satyajeet Tambe In karad
Satyajeet Tambe In karadsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Satyajeet Tambe News : काँग्रेसमधील Congress वरिष्ठांशी माझे कोणाशीही मतभेद झालेले नाहीत. आम्ही पिढ्यान पिढ्या 100 वर्षे कॉंग्रेसचेच काम करणारे आहोत. निवडणूक काळात काही ठराविक लोकांनी जे गैरसमज निर्माण केले, त्यामुळे पक्षातून मला बाहेर काढले. मी कॉंग्रेसबाबत नाराज नसुन माझी नाराजी दूर व्हायला मला कोणी बोलावलं तर चर्चा होईल. चर्चा झाली तर नाराजी दूर होईल. पण अजून मला कोणी बोलवलंच नाही, असे सुचक वक्तव्य आमदार सत्यजित तांबे Satyajeet Tambe यांनी केले.

नाशिक पदवीधर मतदार संघातुन निवडून आल्यानंतर आमदार तांबे यांनी कऱ्हाड (जि.सातारा) येथील जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते. युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, शिवाजी विद्यापीठचे सिनेटचे सदस्य अमित जाधव, अभिजीत पाटील, राहूल पवार आदी उपस्थित होते.

आमदार तांबे म्हणाले, निवडणुकीच्या काळात काही ठराविक लोकांनी गैरसमज निर्माण केले. त्याच्यातून पक्षाने माझ्यावर निलंबनाची कारवाई केली. पक्षाने मला बाहेर काढलं असलं तरी आम्ही पिढ्यानं पिढ्या काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत. आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये 100 वर्ष होत आहेत.

Satyajeet Tambe In karad
Satara News : राष्ट्रवादीमधील कुणीही फुटणार नाही; शशिकांत शिंदेंचा विश्वास

माझे 22 वर्ष विद्यार्थी चळवळीपासून युवक चळवळीपासून काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला ढकलून देण्याचा जो प्रयत्न काही ठराविक लोकांकडून झाला त्या विरोधात आमची लढाई होती, आणि ती अजूनही सुरुच आहे. माझी नाराजी दूर व्हायला मला बोलावलं तर चर्चा होईल. चर्चा झाली तर नाराजी दूर होईल. मात्र अजून मला चर्चेला कोणी बोलवलंच नाही.

Satyajeet Tambe In karad
BJP-Congress Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक; राज्यभर 'शर्म करो मोदी' आंदोलन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com