Legislative Council sarkarnama
मुंबई

विधान परिषदेसाठी दरेकरांचे नाव निश्चित? तीन जागांसाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग

विधान परिषदेच्याही (Legislative Council) १० जागा रिक्त होणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, अशातच भाजपमध्ये (BJP) विधानपरिषदेसाठी (Legislative Council) इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपमध्ये तर आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेवर भाजपचे चार जण सहज निवडून जाणार आहेत. त्यामुळे जोरदार लॉबिंग सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती, सूत्रांची आहे आहे.

विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपमध्ये अनेक नेते इच्छकू आहेत. भाजप नेते प्रसाद लाड आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यापैकी एकाला पुन्हा विधान परिषदेमध्ये संधी मिळू शकते, असेही सांगितले जात आहे. एकीकडे दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), चित्रा वाघ (Chitra Wagh), अनिल बोंडे, राम शिंदे (Ram Shinde), कृपा शंकर सिंग यांची नावे चर्चेत आहे. मात्र, भाजपच्या वरिष्ठांकडून चार जागेसाठी कुणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही.

विधान परिषदेच्या जागांसाठी बऱ्याच नेत्यांची लाईन लागली आहे. यामध्ये शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि सुरजित सिंह ठाकूर यांना विधान परिषदेत पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. भाजपकडे मित्रपक्ष मिळून जवळपास ११३ मते आहेत. त्यामुळे भाजपच्या सहज चार जागा निवडून येतात. त्यामुळे चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. विधान परिषदेच्या 10 जागांचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपत आहे. त्यामध्ये प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुरजीतसिंह ठाकुर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय दौंड, रामराजे निंबाळकर, रवींद्र फाटक यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT