'सरकारनामा' पोल : संभाजीराजेंची अपक्ष भूमिका योग्य; शिवसेनेची उमेदवारी स्वीकारु नये

Sambhajiraje Chhtrapati | Shivsena : संभाजीराजेंपुढे शिवसेनेत येण्याची आणि शिवसेनेचा प्रचार करण्याची ऑफर
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी वेगाने घडामोडी घडत आहेत. या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली आहे. मात्र सहावी जागा शिवसेना (Shivsena) लढविणार असल्याने संभाजीराजे यांनी नुकतीच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली. यात उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे शिवसेनेत येण्याची आणि शिवसेनेचा प्रचार करण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे.

या चर्चेदरम्यान शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींपुढे राज्यसभेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला. मात्र संभाजीराजे यांनी माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिला. त्यावर ठाकरे यांनी संभाजीराजेंना ४ अटी घातल्या. मात्र या अटींचा तपशील ऐकताच ते नाराज झाले असून त्यांनी या अटींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना विचार करून कळवतो असे सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजेंचा गेम होणार? भाजपच्या प्रवीण दरेकरांनी दिले वेगळेच संकेत

मात्र या सगळ्या घडामोडींनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत जाण्यास किंवा शिवसेनेची उमेदवारी स्वीकारावी यासाठी त्यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला असल्याचे दिसून येत आहे. 'सरकारनामा'ने छत्रपती संभाजीराजे यांची शिवसेना पक्षप्रवेशाची ऑफर स्वीकारावी का? याबाबत फेसबूक पेजवरुन वाचकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये बहुतांश वाचकांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांनी शिवसेनेत जावू नये तर आपली अपक्ष भूमिका कायम ठेवावी असे मत व्यक्त केले आहे.

काय आहेत संभाजीराजे छत्रपतींपुढील अटी?

  • संभाजीराजे छत्रपती शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तरी संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांसोबतच असणार.

  • संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर सोबत राहणार. राज्यसभेतील विधेयकं आणि इतर राजकीय निर्णयांशी संंबंधित संभाजीराजेंची भूमिका ही शिवसेनेची जी अधिकृत भूमिका असेल तिच असणार.

  • अगामी सर्व निवडणुकांमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचा प्रचार करणार.

  • शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती असले तरी ते शिवसेनेचे २३ वे खासदार म्हणूनच कार्यरत रहाणार.

Sambhajiraje Chhatrapati
"संभाजीराजेंना कधीही भाजपचा प्रचार करायला लावला नाही" : फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

राज्यसभेच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे मंत्री अनिल परब (Anil parab) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com