Disha Salian Death Case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, हा तपास आता सीबीआयकडं सोपवण्यात आला आहे. तसंच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही हायकोर्टानं दिले आहेत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची मुंबई हायकोर्टात सुरु असलेली सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली होती, पण कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. आज बुधवारी हा निकाल जाहीर करण्यात आला.
न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजीतसिंह भोसले यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. याप्रकरणी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. यामध्ये आपल्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिला मारण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं खंडपीठानं या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पूर्ण केली. त्यानंतर यासंदर्भातील निकाल राखून ठेवला होता. आज बुधवारी हा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यानुसार, दिशाच्या वडिलांना सीबीआयच्या तपासावर आक्षेप नोंदवण्याचा अधिकार असल्याचं सांगत. याप्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन बीएनएस अंतर्गत याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही खंडपीठानं दिले आहेत. कोर्टाच्या या निकालानंतर दिशाचे वडील आणि भावानं त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, यापूर्वी दिशा सालियानं मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचं शेवटपर्यंत म्हटलं होतं. यासंदर्भात पोलिसांनी केवळ एडीआर दाखल केला होता. याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला नसतो. पण आता हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनाच या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश देताना याप्रकरणात गुन्हा दाखल करायला सांगितला आहे. त्यामुळं आता ही खरंच आत्महत्या केली की हत्या होती? याचा तपास होईल.
दरम्यान, या प्रकरणात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचंही नाव या प्रकरणात आल्यानंतर त्यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं की, मुंबई पोलिसांच्या तपासाअंती ही आत्महत्याच असल्याचं समोर आलं आहे तर याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात यावा, म्हणजेच या प्रकरणाची फाईल कायमची संपवून टाकावी अशी मागणीही त्यांनी केली होती. कारण याप्रकरणात आदित्य ठाकरेंच्या राजकीय प्रतिस्पर्धींकडूनही मुद्दामून वारंवार आरोप होत असल्याचंही ठाकरेंच्या वकिलांनी म्हटलं होतं.
८ जून २०२०च्या मध्यरात्री मुंबईतील मलाडमधील एका इमारतीच्या अंदाजे १२व्या किंवा १४व्या मजल्यावरून पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईतील मालवणी पोलिसांनी हा मृत्यू अपघाती मृत्यू अहवाल (ADR) म्हमून नोंदवला आणि नंतर तपास बंद करताना ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, मृत्यूचे कारण म्हणजे डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना उंचीवरून पडण्यामुळं झालेल्या गंभीर जखमा हा होता. यामध्ये दिशाच्या शरिरावर लैंगिक अत्याचार किंवा शारीरिक हल्ल्याच्या कोणत्याही खुना आढळून आलेल्या नाही.
पोलिसांच्या मते, दिशा सालियान मानसिक तणावाखाली होती. कुटुंबातील वाद, व्यावसायिक अडचणी आणि इतर वैयक्तिक समस्यांमुळं रक्ताच्या तपासणीत दारूचे प्रमाण आढळले. साक्षीदारांच्या जबाबात, CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांमध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI ला देखील दिशा सालियानच्या मृत्यूशी जुळणारा पुरावा सापडला नव्हता, त्यामुळं दिशाचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचंच शेवटपर्यंत मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.