DJ Controversy : पुण्यानंतर ठाण्यातही 'डीजे'ला विरोध; डॉ.महेश बेडेकर मैदानात; राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात?

Thane Dr Mahesh Bedekar : गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर डीजेला विरोध होत आहे. सणाच्या नावाखाली वाढत चाललेल्या उन्मादाला विरोध असल्याचे मत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले.
Dr Mahesh Bedekar
Dr Mahesh Bedekarsarkarnama
Published on
Updated on

Thane News : गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर डीजेला विरोध करण्यात येत आहे. नागरिकांना त्रास होत असताना देखील डीजे वाजवण्याती भूमिका मंडळांकडून घेतली जात आहे. त्याविरोधात पुण्यात आंदोलन देखील झाले. ठाण्यात देखील डीजेला विरोध केला जात आहे.

‘सणांना किंवा धर्माला विरोध नाही; मात्र सणाच्या नावाखाली वाढत चाललेल्या उन्मादाला विरोध असल्याचे स्पष्ट मत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले आहे.

सण-उत्सवांच्या नावाखाली होणारे ध्वनी व पर्यावरण प्रदूषण, वाहतुकीला होणारे अडथळे आणि सार्वजनिक नियमांचे उल्लंघन यावर डॉ. बेडेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच उत्सवांच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी केली.

सण-उत्सवांमुळे होणाऱ्या सार्वजनिक त्रासाचा मुद्दा बेडेकर यांनी २०१२ पासून सातत्याने उपस्थित केला. महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे प्रश्न मांडल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तब्बल दहा वर्षे चाललेल्या या प्रकरणात सार्वजनिक रस्ते, मंडप, वाहतूक व्यवस्था आणि ध्वनी प्रदूषण यांसारख्या मुद्द्यांवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिल्याचे याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले.

‘माझा धर्म कोणता, मी हिंदू आहे की नाही, असे प्रश्न मला विचारले गेले. सण साजरा करताना सार्वजनिक नियमांचे पालन का होऊ नये?’ असा सवाल त्यांनी केला. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात कचरा, ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मंडप आणि मिरवणुकांमुळे वाहतुकीवर परिणाम होतो. याचा फटका रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आणि सामान्य नागरिकांना बसतो, असे ते म्हणाले.

Dr Mahesh Bedekar
Pune DJ Controversy: पुण्यात 'डीजे'च्या आवाजाचा मुद्दा तापला; भाजप खासदार मेधा कुलकर्णींची रोखठोक भूमिका आली समोर

दहीहंडी आणि मिरवणुकांमधील अपघात व जीवितहानीकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘दरवर्षी अपघात, गंभीर दुखापती आणि मृत्यू होत असताना आपण त्याकडे किती काळ दुर्लक्ष करणार?’ सार्वजनिक ठिकाणी डीजेचा वापर, ध्वनीची मर्यादा, रस्त्यांवरील मंडप आणि वाहतूक अडथळ्यांबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पर्यावरणपूरक उत्सवांना प्रोत्साहन देण्याबरोबरच ‘एक गाव, एक गणपती’सारख्या एकत्रित उत्सवांच्या संकल्पनांना प्रोत्साहन दिल्यास सामाजिक एकोपा वाढू शकतो, असेही त्यांनी सांगितले. सण साजरे करा; परंपरा आणि संस्कृती जपा. मात्र दुसऱ्याच्या आरोग्याची, शांततेची आणि जगण्याच्या अधिकाराची किंमत मोजून उत्सव साजरा करू नका. उत्सव मोठा नव्हे, तर संवेदनशील असला पाहिजे,’ असा सल्ला देखील डॉ. बेडेकर यांनी दिला.

राजकीय पक्षांची भूमिका काय?

सामान्य नागरिक डीजेला विरोध करत असताना राजकीय पक्षांची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने डीजेला उघडपणे विरोध करत असल्याची भूमिका घेतली नाही. गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी देखील आमच्या सणांविरोध का असे म्हणत आम्ही डीजे वाजवणार, अशी भूमिका घेतली आहे.

Dr Mahesh Bedekar
Pune DJ : 'डीजे' वादात पुणे भाजप बॅकफुटला? CM फडणवीसांचे मोठे संकेत; कार्यकारिणी बैठकीतून केलं आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com