Disha Salian Case Bombay High Court Latest Update Sarkarnama
मुंबई

Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या वकीलाचेही नाव; असीम सरोदेंची पोस्ट व्हायरल

Asim Sarode X post on Disha Salian death case:दिशा सालियन प्रकरणात असीम सरोदे यांचे नाव प्रतिवादी म्हणून आल्याची चर्चा; सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी उपस्थित केले सवाल.

Sudesh Mitkar
  • दिशा सालियन मृत्यू प्रकरणात असीम सरोदे यांचे नाव प्रतिवादी म्हणून आल्याने चर्चा.

  • या प्रकरणाशी आपला संबंध नसताना नाव का समाविष्ट केले, असा सरोदेंचा सवाल.

  • ठाणे न्यायालयात दाखल मानहानीच्या खटल्यावर सरोदेंनी व्यक्त केली चिंता.

Pune News: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवनवीन राजकीय व कायदेशीर वळणे समोर येत आहेत. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील आणि कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचे नाव प्रतिवादी म्हणून समोर आल्याने मोठी चर्चा रंगली आहे.

याच पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. या प्रकरणाशी आपला दूरदूरपर्यंत संबंध नसतानाही आपले नाव का ओढण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

x पोस्टमध्ये असीम सरोदे म्हणतात....

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात माझा काडीचाही संबंध नसतांना माझे नाव उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संजय राऊत, अनिल देशमुख, अखिल चित्रे, वरुण सरदेसाई यांच्यासह प्रतिवादी म्हणून मानहानीचा खटल्यात का घालण्यात आले? मला काहीच उलगडा होत नाहीये.

माझा तर या प्रकरणाशी मुळीच संबंध नाही शिवाय इतर कुणाचाही काही संबंध असेल असे मला वाटत नाही. उद्धव ठाकरे साहेबांची कमाल आहे की पक्षफुटीपासून तर अशा कितीतरी आरोपांपर्यंत अनेक गोष्टींचा व गलिच्छ राजकारणाचा सामना ते अत्यंत शांतपणे व ताकदीने करीत आहेत असं असीम सरोदे म्हणाले.

सरोदे म्हणाले, दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य सात जणांविरोधात मानहानीचा अशी काहीतरी केस ठाणे कोर्टात दाखल झाल्याचे मला फ्रीप्रेस जर्नल च्या बातमीतून कळाले. आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कायद्याचा वापर न्याय मिळविण्याचे साधन म्हणून करावा परंतु इतरांना जखमी करण्यासाठी शस्त्र म्हणूनच कायदा वापरण्यामागील प्रेरणा काय असतात हा संशोधनाचा विषय आहे. असं म्हणत त्यांनी सदर प्रकरणावरती चिंता व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT