New Education Policy: नवी पुस्तके, जुनीच पद्धत! परीक्षा तोंडावर, मूल्यमापनाच्या नियमांअभावी शिक्षक संभ्रमात

New Education Policy Teacher Guidelines in Maharashtra: महाराष्ट्रात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या मूल्यमापनाबाबत शिक्षक संभ्रमात. मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा कायम.
New Education Policy Teacher Guidelines in Maharashtra:
New Education Policy Teacher Guidelines in Maharashtra:Sarkarnama
Published on: 
Updated on: 

मीनाक्षी गुरव

New Education Policy: राज्यातील शालेय शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत नवे बदल स्वीकारले जात असतानाच एक नवीन पेच निर्माण झाला आहे. यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली आहेत. मात्र, पहिल्या सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या तरी नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, याबाबत स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत. परिणामी, जुन्याच पद्धतीने गुण द्यावेत की नव्या सूचनांची वाट पाहावी, अशा द्विधा मनःस्थितीत राज्यभरातील शिक्षक अडकले आहेत.

नेमकी अडचण काय?

२०१० ची जुनीच पद्धत वापण्याची वेळ: शिक्षण विभागाने नव्या मूल्यांकनाची नियमावली जाहीर न केल्यामुळे शिक्षकांवर २० ऑगस्ट २०१० च्या जुन्याच 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन' (CCE) पद्धतीनुसार काम करण्याची वेळ आली आहे.

अंकांची गणितं बिघडली: २०१० च्या नियमांनुसार कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांचे फक्त संकलित मूल्यमापन होते. परंतु, नव्या रचनेत हे विषय बदलले असून सहावीसाठी 'व्यावसायिक शिक्षण' हा १०० गुणांचा नवीन विषय जोडला गेला आहे. या विषयाचे गुणदान कसे करावे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

New Education Policy Teacher Guidelines in Maharashtra:
Maharashtra Retired Employees: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतनवाढीला ब्रेक! वित्त विभागाचा मोठा आदेश

संकल्पनात्मक आकलनाचा अभाव: नव्या शैक्षणिक धोरणात केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांचे आकलन, कौशल्य, सृजनशीलता आणि प्रात्यक्षिक ज्ञानाचे परीक्षण करण्याचे सूचित केले आहे. मात्र, त्यानुसार मूल्यमापनाची नवी पद्धत अद्याप शाळांपर्यंत पोहोचलेली नाही.

New Education Policy Teacher Guidelines in Maharashtra:
School Admission Age Limit: नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशाचे नियम बदलले! कोणत्या वर्गासाठी किती वय पूर्ण हवे? पालकांनो, जाणून घ्या नवा GR

"नव्या व्यावसायिक शिक्षण विषयाच्या १०० गुणांचे आणि कला-क्रीडा विषयांचे मूल्यांकन कसे करावे, याबाबत स्पष्टता नसल्याने शिक्षकांना गुण भरणे कठीण जात आहे. जोपर्यंत मूल्यांकन पद्धत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या विषयांकडे गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता कमीच आहे."

महेंद्र गणपुले (माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ)

"नव्या अभ्यासक्रमावर आधारित मूल्यमापन पद्धतीवर सध्या काम सुरू आहे. या इयत्तांच्या मूल्यांकनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच अधिकृतपणे जाहीर केल्या जातील."

डॉ. कमलादेवी आवटे (सहसंचालक, SCERT)

शिक्षकांची मागणी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) प्रगतीपत्रकाचा आधार स्पष्ट करणाऱ्या मूल्यमापनविषयक स्वतंत्र मार्गदर्शक सूचना त्वरित जाहीर कराव्यात, अशी जोरदार मागणी शिक्षक वर्गाकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com