nitesh Rane, Kishori Pednekar
nitesh Rane, Kishori Pednekar sarkarnama
मुंबई

किशोरीताई, वेळ-तारीख कळवा, दिशा सालियनला न्याय मिळालाच पाहिजे!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजप नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषदेत अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh)आणि दिशा सालियन (Disha Salian)या प्रकरणावरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे त्यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी मुंबईच्या महापैार किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख केला. पेडणेकर म्हणाल्या, ''दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतरही तिला काही जणांनी बदनाम केले. तिला न्याय मिळाला नाही,'' यावर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी टि्वट केले आहे. 'मी येतो महिला आयोगाकडे तुमच्या बरोबर..वेळ आणि तारीख कळवा,'' असे राणेंनी पेडणेकरांना म्हटलं आहे.

''महापौर ताई.. दिशा सालियनची मृत्यूनंतरही बदनामी, व्यथित झालेय..बरोबर.. खरंच तीला न्याय मिळालाच पाहिजे.. म्हणून तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा कशी होईल त्यासाठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या. मी येतो महिला आयोगाकडे तुमच्या बरोबर. वेळ आणि तारीख कळवा,'' असे नितेश राणेंनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, ''दिशा सालियनच्या मृत्यूबाबत सुशांत सिंगला जेव्हा कळलं, तेव्हा तो म्हणाला मै इनको छोडूंगा नही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्याच्या घरात दिशावरून बाचाबाची झाली. त्यात त्याची हत्या केली गेली. तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती. त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही13 जूनला गायब झाले, हे सीसीटीव्ही यापूर्वी याठिकाणी होते, असे त्या सोसायटीतील नागरिक सांगतात,''

''ठराविक माणसांची अॅम्ब्युलन्स कशी आली. हॉस्पिटलला त्याला कोणी नेले. याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे ही उघड होणार. तेही माहिती करतील सर्व. रमेश मोरेंची हत्या कुणी केली. का केली कुणी केली. त्यांची कुणाचा संबंध नव्हता. जयंत जाधवची हत्या का झाली. आम्ही काढलं नाही. खोलात जाईल हे आम्हाला माहीत नाही का,'' असा इशाराही त्यांनी दिला.

राणे म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे, 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिनं आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितलं. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होतं. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होतं. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचं होतं. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील 8 जूनची पानं कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT