मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही ; राऊतांचा मोदींवर निशाणा

आजही आम्ही जे ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत ते दिल्ली पुढे झुकणार नाही, दिल्ली पुढे शरण जाणार नाही.
sajay raut, Narendra Modi
sajay raut, Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देशात आज ( 19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj)यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sajay raut) यांनी टि्वट करीत पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवजयंतीनिमित्त संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो टि्वट केला आहे. ''मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही,'' अशा शब्दात राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे.

''महाराष्ट्र नाही तर देशाचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे. छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकचं गोष्ट शिकला तो म्हणजे स्वाभिमान. मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही हा शिवरायांचा बाणा महाराष्ट्राने जपला,'' असे राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

sajay raut, Narendra Modi
सत्तेचा गैरवापर करुन 'जरंडेश्वर'च्या अवसायनाची काढलेली नोटीस खोडसाळपणाची!

संजय राऊत म्हणाले, ''आजही आम्ही जे ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत ते दिल्ली पुढे झुकणार नाही, दिल्ली पुढे शरण जाणार नाही. तेव्हा औरंगजेब होता आज दुसरा कुणी असेल पण दिल्लीने कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही झुकणार नाही,''

सरकारकडून केवळ संकल्प, मात्र ठोस कृती नाही!

पुणे : गड किल्ले संवर्धनासाठीचे शिवनेरी मॉडेल झाल्यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर किल्ल्यांच्या संवर्धन आणि विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे अशी मागणी २००७ पासून जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने विविध मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र या मागणीकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)मुख्यमंत्री झाल्यानंतर गड किल्ले संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था, संघटनांना आशेचा किरण दिसला. मात्र गेली ९ महिन्यांपासून एखादी बैठक वगळता कोणतेही ठोस काम कक्षाकडुन झालेले दिसत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com