Shiv Sena
Shiv Sena sarkarnama
मुंबई

शिवसैनिकांमध्ये राडा; शिवसेनेच्या महिलांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना दिला चोप

सरकारनामा ब्यूरो

Dasara Melava 2022 : नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेनेच्या (Shivsena) आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. या घटनेचा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांनी चोप दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. आपआपली ताकद दाखवण्यासाठी गाड्यांचे ताफे घेऊन शिवसैनिक एकत्रीत मुंबईकडे रवाना झाले आहे.

दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाशिक-मुंबई महामार्गाशेजारील शहापूर येथे राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी चालत्या वाहनातून अश्लील इशारे केल्याचा आरोप ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांनी केला.

शिवाय याच कारणावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या महिलांनी रस्त्यात चांगलाच चोप दिला. या घटनेचा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे मेळावा पार पडण्याच्या आधीच या मेळाव्यांना गालबोट लागल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT