औरंगाबाद : भगवान भक्तीगडावरील मेळाव्याला हजारोंच्या संख्येने आलेले पंकजा मुंडे समर्थक ` पंकजाताई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है`, अशा घोषणा देत होते. (Beed) याचा संदर्भ देत खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी आता ही घोषणा बदलायला हवी, असे आवाहन उपस्थितांना केले. अजून कितीकाळ संघर्ष करायचा, असे म्हणत आता पंकजाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है`, असे म्हण्यास सांगितले.
प्रीतम मुंडे यांच्या या विधानाच उल्लेख आपल्या भाषणात करत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र आपली शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. सावरगावच्या दसऱ्या मेळाव्यात खासदार प्रतीम मुंडे यांनी मोजक्या शब्दात भाषण केले. मेळाव्याला घरच्या भाकरी बांधून आलेल्या हजारोंच्या संख्येला त्यांनी अभिवादन करत पंकजा मुंडेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देखील केले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पराभव झालेल्या पकंजा मुंडे यांना राज्य आणि देश पातळीवरील नेतृत्वाने कायम डावलेली अशी भावना पंकजा समर्थकांमध्ये आहे. अगदी राज्यसभा, विधान परिषदेत देखील पंकजांना डावलून नवख्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे पंकजा समर्थकांनी अनेकदा टोकाची भूमिका घेत आता निर्णय घ्या असे, म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
अनेक प्रकारे नाराजी व्यक्त करून देखील पक्षाने त्याची दखल घेतली नाही. पक्षाकडून होणाऱ्या या अन्यायातूनच प्रीतम मुंडे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा आता यापुढे नको, त्यात बदल करा, असे सुचवले. पकंजा मुंडे यांनी पक्षासाठी सर्वस्व दिले, त्यामुळे त्यांनी आणखी किती दिवस संघर्ष करायचा? असा सवाल प्रीतम यांनी उपस्थितीत केला.
आता पंकजाताई संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है ऐवजी, पंकजाताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है` असा बदल करा, असे देखील त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात प्रीतम मुंडे यांच्या त्या विधानाचा आवर्जून उल्लेख केला. आपल्या वाट्याला संघर्षच आलेला आहे, राजकारणात तो कुणालाच चुकला नाही, त्यामुळे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपली संघर्ष करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
पंकजा मुंडे यांची ओळख संघर्ष कन्या म्हणून राज्याला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यात पंकजा मुंडे यांना करावा लागणार संघर्ष पाहता प्रीतम मुंडे यांचे विधान आणि त्यावर पंकजा यांनी दिलेले उत्तर बरेच काही सांगून जाणारे म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.