Crime News
Crime News Sarkarnama
मुंबई

Crime : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आफताबचा डॅाक्टरचं ठरणार महत्वाचा पुरावा...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून हत्तेच्या उलगडा करत असताना रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती आतापर्यंत अनेक पुरावे हाती लागले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांच्या (Police) हाती एक महत्वाचा पुरावा हाती लागल्याने या प्रकरणाचा उलगडा करणे पोलिसांना सोपं झालं असल्याचे बोलले जात आहे. (Mumbai, Delhi Latest Crime News)

श्रद्धाची हत्या करणारा आरोपी आफताबला आज दिल्ली पोलीस न्यायायालयासमोर हजर करणार असून या आधी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ती कोठडी आज संपणार असल्याने पोलीस त्याला आज न्यायालयासमोर हजर करतील आणि त्याच्या कोठडीची मागणी करू शकतात.

नेमक प्रकरण काय ?

श्रद्धा आणि आफताबचं 18 मे ला घरगुती खर्चावरून भांडण झालं होतं. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या खात्यावरून 55 हजार रुपये काढले आणि या पैशाचा वापर फ्रिज आणि धारदार चाकू खरेदीसाठी केला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची आज डीएनए (DNA) टेस्ट होणार असून आफताबवर उपचार केलेले डॉक्टर हे या प्रकरणातील मुख्य पुरावा ठरू शकतात.

दरम्यान, या प्रकरणाची तपासणीकरीता पोलीस जेव्हा आफताबच्या घरी गेले. तेव्हा पोलिसांना त्याच्या घरामध्ये एका डॉक्टरची चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीमध्ये त्याच्यावर उपचार केल्याची माहिती मिळाली असून या चिठ्ठीनुसार पोलीस जेव्हा संबधित डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेले तेव्हा डॉक्टरांकडून आफताबच्या हातावर उपचार केल्याची माहिती मिळाली असून हेच डॉक्टर आता या प्रकरणांमध्ये मुख्य पुरावा होऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT