Mohit Kamboj sarkarnama
मुंबई

हिमंत असेल तर ‘द महाराष्ट्र फाईल्स’बनवा ; मोहित कंबोजांचे थेट बॅालिवुडला आव्हान

चित्रपटावरुन देशभरात भाजप आणि विरोधक यांच्यात वाद रंगत आहे. शिवसेना आणि कॉग्रेसने या चित्रपटावरुन भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटावरुन देशभरात भाजप आणि विरोधक यांच्यात वाद रंगत आहे. शिवसेना आणि कॉग्रेसने या चित्रपटावरुन भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या चित्रपटावर आतापर्यंत अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सत्य लपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

भाजपचे नेते (bjp)मोहित कंबोज ( Mohit Kamboj)यांनी बॅालिवूडला सवाल केला आहे. मोहित यांनी टि्वट करीत बॅालिवूडवर टीकास्त्र सोडले आहे.

“बॉलिवूडमध्ये असे कुणी आहे का, जो हिंमत करून ‘द महाराष्ट्र फाईल्स’ आणि ‘ट्रूथ बिहाईंड दाऊद अॅंड नेतास नेक्सस’ यावर चित्रपट बनवेल.”, असे ट्वीट मोहित कंबोज यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’हा चित्रपट बघितला आहे. मोदींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. भाजपकडून हा चित्रपट म्हणजे कॉंग्रेसमुळे काश्मिरी जनतेला भोगावे लागणारे अन्याय, अत्याचार असल्याचे ज्वलंत उदाहरण म्हटले जात आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींना निशाण्यावर धरत अनेक सवाल केले आहेत.

संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याची घोषणा केली होती. तेव्हा आता मोदीजी तुम्ही पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे वीर सावरकर यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल का?

पिंपरी-चिंचवडमध्ये,तर भाजपचे शहराध्यक्ष,भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या पिक्चरचा एक पू्र्ण ‘शो’च बुक करून तो आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी (ता.२०)रात्री मल्टीप्लेक्समध्ये पाहिला.त्यातून हिंदूस्थानसाठी प्रत्येक नागरिकाची एकजूट होणार असल्याने आपल्या आयुष्यातले हे सर्वात चांगले काम असल्याचे लांडगे यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT