dombivli gangrape sarkarnama
मुंबई

धक्कादायक : डोबिंवलीत अल्पवयीन मुलीवर २९ जणांकडून सामूहिक बलात्कार

पीडित मुलीच्या प्रियकराने तिच्यावर शारीरिक अत्याचार करत त्याचा व्हिडीओ काढला होता. या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचे समजते.

सरकारनामा ब्युरो़

डोबिंवली : मुंबईतील साकीनाका येथील घटनेनंतर देशभर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा डोबिंवली (dombivli) हादरली आहे. डोंबिवलीत भोपर परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप (rape) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 29 जणांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे त्यामध्ये दोन अल्पवयीन आरोपी आहेत.

सध्या पीडित मुलीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भोपर परिसरात आरोपींची धरपकड सुरु केली आहे.या घटनेतील आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सुमारे 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 6 जणांचा शोध सुरू आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये आरोपींकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात येत होते. काल (ता. 22) स्वत: पीडित मुलीने मानपाडा पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ही खळबळजनक घटना उजेडात आली. पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेत जेव्हा तिच्याकडे विचारपूस सुरु केली तेव्हा तिने ही धक्कादायक माहिती दिली.

पीडित मुलीच्या प्रियकराने तिच्यावर शारीरिक अत्याचार करत त्याचा व्हिडीओ काढला होता. या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे समजते. मुलीने दिलेल्या जबाबानुसार अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराले यांनी सांगितले की, 'जानेवारी महिन्यात तिच्या एका मित्राने तिच्यावर बलात्कार केला होता. यावेळी त्याने व्हीडिओ देखील शूट केला होता. हाच व्हीडिओ नंतर त्याने आपल्या मित्रांना देखील दाखवला. याच व्हीडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत 29 जणांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत, वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेल्याचं म्हटलं आहे'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT