Raju Patil latest statement on Maharashtra issues Sarkarnama
मुंबई

Dombivli Gymkhana Election : डोंबिवली जिमखाना निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप; माजी आमदाराचा गंभीर आरोप

Raju Patil Dombivli Politics : डोंबिलली जिमखाना निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivli News : डोंबिवलीतील प्रतिष्ठित डोंबिवली जिमखान्याच्या कार्यकारिणीची निवडणूक येत्या १६ ऑगस्ट रोजी होत असून, निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी यांनी या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे.

राजू पाटील यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आपण डोंबिवली जिमखान्याचे आजीवन सदस्य असल्याचे आहे. मात्र, यापूर्वी जिमखान्याच्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला नाही. निवडून आलेले सदस्य कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक असले तरी जिमखान्याच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाल्याचे कधी जाणवले नाही.मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना स्पष्टपणे राजकीय हस्तक्षेप जाणवत आहे.

विशेष म्हणजे, पाटील यांनी आपल्या पोस्टमधून डोंबिवलीतील सावरकर उद्यान आणि नेहरू मैदानाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. “मैदानांचे लचके तोडणारी मंडळी यावेळी निवडणूक लढवताना दिसत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत जिमखाना सदस्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

जिमखान्याची अराजकीय आणि स्वायत्त ओळख कायम राहावी, अशी भूमिका घेत पाटील यांनी सदस्यांना विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जिमखाना भविष्यात कोणत्याही एका राजकीय पक्षाचे मैदान होऊ नये, यासाठी सदस्यांनी सजग राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, १६ ऑगस्टच्या निवडणुकीपूर्वीच झालेल्या या राजकीय आरोपांमुळे जिमखान्याच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले आहे. पाटील यांच्या “मैदानांचे लचके तोडणारी मंडळी” या उल्लेखाचा नेमका संदर्भ कोणाकडे आहे, याची चर्चा आता डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT