Pune NCP News: राष्ट्रवादीला पुण्यात लवकरच मोठा धक्का बसणार? तडफदार महिला नेत्या लवकरच राजीनामा देणार? पोस्टमधून दिले संकेत

Ajit Pawar NCP Politics: रुपाली पाटील ठोंबरे यांनी मोठा राजकीय काळ मनसेत काढल्यानंतर राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी विविध आंदोलनं तसेच विविध गुन्हेगारी व राजकीय प्रकरणांवरुन आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं.
Rupali Patil Thombare  .jpg
Rupali Patil Thombare .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: एकीकडे राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरदारपणे सुरू आहे. याचदरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादी केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीसोबत जाणार असल्याचेही बोललं जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात पडद्यामागं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मोठा राजकीय काळ काढल्यानंतर मनसेत काढल्यानंतर राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केला होता. त्यानंतर त्यांनी हाती घड्याळ घेत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांनी विविध आंदोलनं तसेच विविध गुन्हेगारी व राजकीय प्रकरणांवरुन आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं. याच रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तडफदार नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी शनिवारी(ता.18) सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये #बापमाणूस_मा_अजितदादा_मला_माफ_करा...मी कायम आपल्या ऋणात आहे.

तुम्ही असताना अन्याय करणाऱ्यांना, पक्षात चाटेगिरी, फुशारकी नाहक गोंधळ घालणाऱ्यांना, काटाकाटी करणाऱ्या नेत्यावर वचक होता आणि कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणाऱ्या लोकांवर वचक शब्दाचा धाक होता,अशी अजितदादांची आठवणही जागवली आहे.

Rupali Patil Thombare  .jpg
Supriya Sule News: बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखतीपासून दूर राहणार, मोठं कारण आलं समोर; ट्विटव्दारे दिली माहिती

तुम्ही काम करणाऱ्या कार्यकर्ताचे,पदाधिकारीचे खमके खंबीर आधार होता. तुमच्याच शब्दाचा मान ठेवून आम्हीही अनेकदा शांत राहिलो. पण तुम्ही गेल्यानंतर काहींनी पक्षातील परिस्थिती अधिकच भयावह केली. कार्यकर्त्यांचा, पदाधिकारीचा संयम हा कमकुवतपणा समजण्याची चूक केल्याचा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी करत पक्षांतर्गत वादाला तोंड फोडले आहे.

तसेच त्यांनी आता अन्याय, दडपशाही आणि विश्वासघात यापुढे सहन करणार नाही असल्याचा इशारा पक्षांतंर्गत विरोधकांना दिला आहे. म्हणूनच, मा. अजितदादा, मला माफ करा... आता कठोर भूमिका घ्यावी लागणार असल्याचं विधान त्यांनी करत लवकरच मोठ्या राजकीय निर्णयाचे संकेत दिले आहेत.

Rupali Patil Thombare  .jpg
Beed News : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यावर हल्ला : 'मुंडके घेऊन या' असा आदेश दिल्याच्या आरोपाने खळबळ

रुपाली पाटील ठोंबरेंनी पोस्टमध्ये तुम्ही असताना आणि तुम्ही नसताना पक्षातील वातावरणाचाल किती मोठा फरक आहे, हे प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला जाणवत असल्याची खंतही व्यक्त केली आहे.

आम्ही तुमची माणसं होतो, आहोत आणि कायम राहू. तुमची शिकवण, तुमची कामे करण्याची पद्धत आणि न्यायासाठी लढण्याची ताकद आम्ही कधीही सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. अजितदादा शब्द आहे. राजकारण वंगाळ करणाऱ्यांना,अन्याय करणाऱ्यांना कोणालाही सोडणार नसल्याचं सांगत रुपाली पाटील ठोंबरेंनी नेमका कोणाला इशारा दिला याची जोरदार चर्चा राष्ट्रवादी आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com