Dombivli News  Sarkarnama
मुंबई

Dombivli Politics : सरकारमधल्या भाजप-शिंदे गटातच लागली चढाओढ; शक्तिप्रदर्शनाची भारीच हौस...

Eknath Shinde And Devendra Fadnavis : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात हा भाग येत असून त्यांनीदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावत आपली ताकद दाखवली..

शर्मिला वाळुंज

Dombivali News : श्री मलंगगड येथे राजकीय शक्तिप्रदर्शनाचे वातावरण दिसून येत आहे. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकप्रकारे आपली ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही बॅनर लागले आहेत. यामुळे आता महायुतीतल्या दोन पक्षांमध्येच ताकद दाखवण्याची सुप्त स्पर्धा लागली आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. (Latest Marathi News)

ठाणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांतील वारकरी मंडळांच्या वतीने श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती असणार आहे, तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत.

तसेच उदघाटन सोहळ्याप्रसंगी अश्व रिंगण होणार असून यासाठी थेट संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले जाणार आहे. यावेळी रिंगण सोहळ्यादरम्यान दिंडीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. काही वेळातच मुख्यमंत्री शिंदे हे या सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डोंबिवली, कल्याण-शीळ रोड, खोणी-तळोजा रोडवर मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. रस्त्यावरील एकही खांब किंवा मोकळी जागा सोडण्यात आलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे झळकाविण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करीत एक प्रकारे शक्तिप्रदर्शन शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात हा भाग येत असून त्यांनीदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावत आपली ताकददेखील कमी नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात जागोजागी हे लागलेले बॅनर म्हणजे एक प्रकारे शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे चित्र दर्शवितात.

(Edited By -Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT