Lok Sabha Election 2024 : महायुतीत सर्वकाही आलबेल नाही? भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण

Mahayuti Seat Sharing Formula Issue : महायुतीत जागावाटपावर नक्की काय चाललंय? भाजप नेत्याचे मोठे विधान...
Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama

जुई जाधव-

Maharashtra Politics Latest News : आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून आता सर्वच पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावर बैठका सुरू झाल्या आहेत. आघाडीतील घटक पक्षांमध्ये दिल्लीत चर्चा होणार आहे. तर आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने गौप्यस्फोट केला आहे.

महायुतीमध्ये सध्या 3 मुख्य पक्ष आहेत. आगामी Lok Sabha Election 2024 च्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरून सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र दिसत आहे. पण काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्या समोर भाजप नेत्याने एक मोठे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बरी आहे. आमच्यात पटकन काही जमेल असे वाटते नाही, असे भाजप नेत्याने म्हटल्याचा दावा काँग्रेस नेत्याकडून करण्यात आला आहे.

Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Thackeray group: ठाकरे गटाची रणनीती ठरली; अरविंद सावंतांसाठी आदित्य ठाकरे मैदानात

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आला आहे. फक्त शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. येत्या काही दिवसांत जागावाटप निश्चित केले जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. महायुतीमध्ये अजून फॉर्म्युला ठरलेला नाही आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागावाटपासाठी महाविकास आघाडीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा जातील यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पण महायुतीमध्ये अद्याप कुठला फॉर्म्युला किंवा चर्चाही झालेली नाही. महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. तिन्ही पक्षांची अद्याप बैठकही झालेली नाही. यामुळे महायुतीत जागावाटपावर सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र आहे.

edited by sachin fulpagare

Devendra fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Sanjay Raut: 'सोम्या-गोम्या'वरून अजितदादा-राऊतांमध्ये जुंपली; इतके नामर्द...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com