Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News: '...तर मला फाशी द्या!'; भाजपच्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाडांचा संयम ढळला

Jitendra Awhad On BJP: "मनुस्मृतीमध्ये स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू म्हटलं आहे, मग ती कोणत्याही जाती-वर्णाची असो. त्यामुळे महिलांबाबत अशी भूमिका घेणारा मनू मला मान्य नाही. मातेबद्दल असं लिहिलेलं मला मान्य नाही."

Jagdish Patil

Jitendra Awhad On BJP: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल (बुधवारी) महाड येथील चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून मनुस्मृतीचे (Manusmriti) दहन केले. या आंदोलनादरम्यान आव्हाडांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Babasaheb Ambedkar) फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. त्यांच्या याच कृत्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून आव्हाडांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

भाजपने राज्यभरात आव्हाडांच्या निषेधार्थ आंदोलनं सुरु केलं आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच मी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार हवं तर मला फाशी द्या, अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "शरद पवारसाहेबांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनुस्मृतीमध्ये स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू म्हटलं आहे, मग ती कोणत्याही जाती-वर्णाची असो. त्यामुळे महिलांबाबत अशी भूमिका घेणारा मनू मला मान्य नाही. मातेबद्दल असं लिहिलेलं मला मान्य नाही. त्यामुळे माझा मनुवादाला विरोध हा असणारच आहे. मात्र, माझ्याकडून काल चुकून जे कृत्य घडलं त्याबद्दल मी आंबेडकरी जनतेची, आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सर्वांची माफी मागितली आहे. परंतु, राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महात्मा फुलेंची माफी मागितली होती का? चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) शिवाजी महाराजांवर बोलले तेव्हा त्यांनी माफी मागितली का? तेव्हा हे भाजपवाले विचारायला गेले नाहीत," असा पलटवार आव्हाडांनी भाजपवर केला.

तसंच यावेळी त्यांनी भाजप माझा वैचारीक शत्रू असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, जातीपातीच्या, धर्माच्या राजकारणामुळे भाजपला माझा विरोध आहे. त्यामुळे मी सनातन्यांच्या विरोधात उभा राहणार, तसंच ज्यांनी वर्चस्ववादाची आणि स्त्री द्वेषाची बीज पेरली त्यांच्या विरोधात मी बोलणार. मी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार हवं तर मला फाशी द्या, अशा शब्दात आव्हाडांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भुजबळ, जयंत पाटील अंधारे म्हणाले उद्देश बघा

दरम्यान, यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील (Janat Patil) आणि सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. हे सर्व नेते जितेंद्र आव्हाडांचा उद्देश काय आहे ते बघा असं म्हणाले आहेत. कारण मी मुद्दाम अशी चूक करणार नाही. हे सर्वांना माहिती असल्याचंही आव्हाड म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT