Jayant Patil News : जितेंद्र आव्हाडांसाठी जयंत पाटील सरसावले, 'त्यांनी 35 वर्ष...'

Jitendra Awad : आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Political News : महाडमध्ये मनुस्मृती दहन करताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले गेले. आव्हाड यांनी या प्रकरणी जाहीर माफी देखील मागितली. मात्र, विरोधक या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. भाजप, रिपाइंने आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन केले. जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी शिवसेनेत्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर पोस्ट करत त्यांची पाठराखन केली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आव्हाडांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

'आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही. आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे.', असे ट्विट जयंत पाटील Jayant Patil यांनी केले आहे.

Jayant Patil
Eknath Shinde news: फडणवीसांनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या रडारवर अगरवाल कुटुंब; बेकायदा बांधकामावर बुलडोझर फिरवा...

'जितेंद्र आव्हाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे.'असे देखील आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्या पाठींब्या बद्दल आभार मानले आहेत. जयंत पाटील यांचे ट्विट रीट्विट करत आव्हाड म्हणाले आहेत की, 'काल अनावधानाने झालेल्या प्रसंगा बद्दल मी लगेच जाहीर माफी मागितली. 185 किलोमीटरचाप्रवास करुन मी माझ्या बापाचा फोटो फाडायला गेलो असतो का. तुमचे सारखे ह्या प्रसंगात सत्याच्या बाजूने उभे राहिले मी आपले आभारी आहे. मरण पत्करेन पण समजत जाती द्वेष आणि स्त्रीद्वेषाची बीजे रोवणाऱ्या मनुला विरोध करू . बापाची शिकवण विसरणार नाही.'

Jayant Patil
Lok Sabha Election Update : सट्टा बाजारातून निवडणूक निकालावर मोठे संकेत;  'एनडीए' 400 पार जाणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com