Dr Sangram Patil Sarkarnama
मुंबई

Sangram Patil Case : संग्राम पाटील प्रकरण महागात पडणार? थेट ब्रिटनने घेतली दखल, मिळणार पाठबळ...

Mumbai Police detention : अनिवासी भारतीय असलेल्या संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी शनिवारी एअरपोर्टवर ताब्यात घेतले होते.

सरकारनामा ब्यूरो

UK takes cognisance : मुंबई पोलिसांनी शनिवारी लंडनहून आलेल्या डॉ. संग्राम पाटील यांना विमानतळावरच ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली होती. जवळपास १५ तास ते पोलिसांच्या ताब्यात होते, असा दावा वकील असीम सरोदे यांनी केला होता. या घटनेचे पडसाद भारतासह ब्रिटनमध्येही उमटले आहे.

डॉ. पाटील हे ब्रिटनचे रहिवासी असल्याने शनिवारच्या घटनेची गंभीर दखल ब्रिटिश उपउच्चायुक्तालयाने घेतली आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सोमवारी थेट पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांना संपूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे संग्राम पाटील प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

उपउच्चायुक्तालयाने पोलिसांकडील प्रथम माहिती अहवाल, सामाजिक माध्यमांवरील मजकूर, तसेच मुंबई विमानतळावरील आगमन-प्रस्थान विभाग आणि मुंबई गुन्हे शाखा कार्यालय यांनी पाटील यांना ताब्यात घेतल्याबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्या कायदेशीर मदतीबाबतही विचारपूस केली. हे प्रकरण निकाली निघेपर्यंत पाठबळ देण्याचे आश्वासन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पाटील यांना दिले आहे.

एवढेच नाही तर पाटील यांना या प्रकरणात भारतीय तपास यंत्रणांकडून योग्यप्रकारे वागणूक मिळेल, यासाठीही उच्चायुक्तालयाची टीम सक्रीय राहणार असल्याचे आश्वासन पाटील यांना देण्यात आले आहे. दरम्यान, असीम सरोदे यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टनंतर हे प्रकरण समोर आले होते. अद्याप संग्राम पाटील यांच्याकडून अधिकृतपणे यावर भाष्य करण्यात आलेले नाही.

काय म्हटले होते असीम सरोदे?

संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले. आत्ताच (साधारण दुपारी ३ वाजता) त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजल्यापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्तानं ताब्यात ठेवलेलं आहे. खरं तर हे अन्याकारक आणि छळवादी आहे.

डॉ संग्राम पाटील यांना पहाटे 2 वाजतापासून अटकाव करून ठेवल्यावर आत्ता 15 तासांनंतर सोडण्यात आले आह आणि ते एरंडोल या जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे रवाना झाले आहेत. केवळ युके ( United Kingdom) चे नागरिकत्व असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत. सत्तेचे सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या पोलिसांनी जो त्रास दिला व छळ केला त्याचा निषेध. भारतातून जातांना पोलिसांना भेटून जावे, असे बंधन त्यांच्यावर घालण्यात आलेले आहे, असे सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT