Mumbai News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा सर्रासपणे वापर केल्याचा आरोप होत आहे. हाच धागा पकडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सक्तवसुली संचालनालय (ईडी), आयकर विभाग (आयटी) आणि 'सीबीआय' हे तीनच पक्ष मजबूत असल्याचा टोला लगावला आहे. (Latest Political News)
शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मणिपूरमधील वांशिक कलहावरही केंद्र सरकारव निशाण साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्येकडील राज्यांना भेट देण्यास आणि त्यावर चर्चा करण्यास तयार नसल्याचाही आरोप केला.
‘एनडीए’चा भाग असलेल्या ३८ पक्षांच्या नेत्यांची गेल्या आठवड्यात दिल्लीत बैठक झाली. भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए’च्या झालेल्या या बैठकीला लक्ष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की भाजपचे सरकार हे ‘एनडीए’ सरकार आहे. निवडणुका संपल्यानंतर ते मोदी सरकार बनते.”
यावेळी भाजप विरोधकांना दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला. ते म्हणाले, “एनडीएमध्ये ३६ पक्ष आहेत. यातील मात्र ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे तीनच मजबूत पक्ष आहेत. बाकी पक्ष कुठे आहेत? काही पक्षांकडे एकही खासदार नाही,” असा घणाघातही ठाकरेंनी सांगितले.
ठाकरे कुटुंब जिथे आहे तिथेच खरी शिवसेना, असेही त्यांनी ठासून सांगितले. ठाकरे म्हणाले, “बंडखोरी केलेल्या अनेक दिग्गजांनी शिवसेनेतील दीर्घकाळ आपली जागा व्यापली होती. आता त्यांच्या जागी नवीन लोकांना संधी मिळू शकते. ज्यांनी शिवसेनेत फूट पाडली त्यांना वाटले होते की ती नष्ट होईल, पण ती पुन्हा उठत आहे. जिथे ठाकरे कुटुंब तीच खरी शिवसेना आहे.”
गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिका दाखल केली. यावर ठाकरे म्हणाले की, “राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्याय न दिल्यास त्यांच्या पक्षासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत.”
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.