Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे 'बॅनर' काही तासांतच गायब

Thackeray Birthday Banner : आक्रमक ठाकरे गटाकडून अज्ञातांविरोधात कारवाईची मागणी
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मुख्यमंत्री शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावलेले 'बॅनर' एका दिवसातच काढण्यात आले आहेत. यामुळे आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी ठाकरे गटाकडून कुणावरही संशय व्यक्त केला नसला तरी या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

Uddhav Thackeray
MNS On Shivsena Podcast: "मला घरी बसायला आवडते"; मोजकंच बोलून मनसेने मुलाखतीवरून ठाकरेंना सुनावले

कल्याणमधील बिर्ला कॉलेज परिसरात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर गायब झाले आहेत. वाढदिवसानिमत्त ठाकरेंना शुभेच्छा देणारे मंगळवारी (ता. २५) लावलेले बॅनर बुधवारी (ता. २६) गायब झाल्याचे दिसून आले. हे बॅनर अज्ञात इसमाने हेतू पुरस्सर काढल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. हे बॅनर काढणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन महात्मा फुले पोलिसांना देण्यात आले आहे.

Uddhav Thackeray
EC Notice To Sharad Pawar: शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस; आता पवार काय भूमिका घेणार ?

ठाकरेंना शुभेच्छा देणारे बॅनर अचनाक एका दिवसात अज्ञाताने जाणून-बुजून काढल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता शहरात कोणताही वाद नको म्हणत ठाकरे गटाने बॅनर काढणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याकडे केली आहे. आता या प्रकरणी पोलीस चौकशी करून काय कारवाई करणार आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com