Sujit Patkar Sarkarnama
मुंबई

Sujit Patkar ED Custody: जम्बो कोविड घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरांना सात दिवसांची ईडी कोठडी

Jumbo Covid Scam: कोविड घोटाळ्यातील आरोपींना ताब्यात घेऊन हे प्रकरण उकरण्याच्या हालचाली तपास यंत्रणांनी वाढवल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ईडीने जम्बो कोविड केअर सेंटर घोटाळा प्रकरणी अखेर खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक केली आहे. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. पाटकर यांना गुरूवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयानं सुजित पाटकर यांना सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वीच सुजित पाटकर यांच्याशी संबंधित या प्रकरणात विविध ठिकाणी छापेमारी केली होती. मुंबईत पंधराहून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिन्स उभारण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या घरावर हे छापे टाकले गेले होते.

अखेर या प्रकरणात आता ईडी(ED)नं सुजित पाटकर यांना ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय व युवासेनेचे पदाधिकारी असलेल्या सूरज चव्हाण यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली होती.

मुंबई महापालिकेतील कोविड सेंटरमध्ये घोटाळ्याचा सुजित पाटकर(Sujit Patkar) यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होती. लाईफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून सुजित पाटकर हे काम पाहत होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. अखेर पाटकर यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यासह डॅा. किशोर बिसुरे यांना अटक केली आहे.

आरोप काय..?

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकांच्या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. सुजित पाटकर यांनी मुंबईतील वेगवेगळ्या जम्बो कोरोना केंद्रात जून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी काढलेल्या निविदा मिळवण्यासाठी 'लाईफलाईन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस' ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी आधी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आली आहे असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT