Sujit Patkar ED Arrested: मोठी बातमी : राऊतांचे निकटवर्तीय पाटकरांना ईडीकडून अटक ; कोविड घोटाळ्यात दोघांवर कारवाई

Covid Scam Case ED Arrested: या अटकसत्रानंतर कोविड घोटाळ्याला पुन्हा 'राजकीय' रंग येण्याची चिन्हे आहेत.
Sanjay Raut, Sujit Patkar
Sanjay Raut, Sujit Patkarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: कोविड घोटाळ्यातील आरोपींना ताब्यात घेऊन हे प्रकरण उकरण्याच्या हालचाली तपास यंत्रणांनी वाढवल्या आहेत. या प्रकरणातील मूळ ठेकेदार असलेले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिचुले यांना 'ईडी'ने बेड्या ठोकल्या आहेत.

या कारवाईने शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांची धास्ती वाढली असल्याचे बोलले जात आहे. या अटकेमुळे ईडीच्या कारवाईचा आवाक वाढून, तपासाची चक्र वेगाने फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटकरांची अटक ही राऊतांना धक्का असल्याची चर्चा आहे. या अटकसत्रानंतर कोविड घोटाळ्याला पुन्हा 'राजकीय' रंग येण्याची चिन्हे आहेत.

Sanjay Raut, Sujit Patkar
What Happened in Malin : माळीणमधल्या घटनेची ती रात्र डोळ्यांपुढे आली...

राऊत यांचे सहकारी पाटकर आणि त्यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट कंपनीने कोविड सेंटरच्या नावावर शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात होता.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या विषयावरुन संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. किरीट सोमय्या यांनी सुजीत पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना केंद्राच्या कंत्राटात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचाआरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीला आता गती मिळाली आहे.

Sanjay Raut, Sujit Patkar
Marathi Films Artists Protest: "बा विठ्ठला" मराठी चित्रपटांना थिएटर मिळू दे ! ; शिंदे सरकारच्या विरोधात निर्माते, कलाकारांचे विठुरायाला साकडे

नेमकं प्रकरण काय आहे?

कोरोना केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजीत पाटकरसह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

  • कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते,असे ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com