Torres Scam Sarkarnama
मुंबई

Torres Scam : टोरेसचं पुढचं 'टार्गेट' अन् 'ईडी' तपासासाठी मैदानात...

ED to Investigate Multi-Crore Torres Scam : मुंबईत हजारो कोटींच्या घोटाळ्यानंतर टोरेसचे पुढचं टार्गेट फिक्स होतं. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता 'ईडी' करणार आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुंबईत हजारो कोटींच्या घोटाळ्यानंतर टोरेसचे पुढील टार्गेट श्रीलंका होते, हे आता तपासात समोर आलं आहे. आरोपी सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉर्न कार्टर आणि माजी संचालक ओलेना स्टोअन यांचा श्रीलंका दौरा झाला होता. तसे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे.

दरम्यान, सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचा तपास आता 'ईडी' देखील करणार आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिसांत दाखल गुन्ह्याच्या आधारे 'ईडी'ने देखील गुन्हा नोंदवला आहे.

मुंबईतील (Mumbai) हजारो कोटींच्या घोटाळ्यानंतर टोरेसचे पुढील टार्गेट श्रीलंका असल्याचे तपासात समोर आलं आहे. यातील पसार आरोपी तौफिक रियाज ऊर्फ जॉर्न कार्टर आणि ओलेना स्टोअन हे त्यासाठी श्रीलंकेत जाऊन आल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं मंगळवारी टोरेसच्या कांदिवली शाखेत छापेमारी केली.

तपास पथकाने पैसे, दागिने अन् तीन तिजोरी पोलिसांच्या (Police) हाती लागल्या आहेत. तसेच गुंतवणूकदारांची कागदपत्रे, व्यवहारासंबंधित कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहेत. आतापर्यंत 3 हजार 700 अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे आले असून, फसवणुकीचा आकडा 57 कोटींवर पोचला आहे.

सव्वा लाख लोकांची फसवणूक

दरम्यान, सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीविरुद्ध 'ईडी'ने मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिसांत स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यातील मास्टरमाईडंने 200 कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठविल्याचा 'ईडी'ला संशय आहे. एकूण दोन हजार गुंतवणूकदारांना 37 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा ईडीला संशय आहे. या कंपनीत एकूण सव्वा लाख लोकांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत असून, या घोटाळ्याची व्याप्ती वाढणार आहे.

'युक्रेन'मधून अकाउंट हॅण्डल

टोरेस कंपनीच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीच्या समाज माध्यम खात्यावर दिशाभूलक करणारे व्हिडिओ शेअर होत आहे. हे व्हिडिओ कोठून पोस्ट होत आहेत, याबाबत मुंबई सायबर पथक शोध घेत आहे. या कंपनीचे संस्थापक तसेच अन्य सहकारी युक्रेनचे रहिवासी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे युक्रेनमधूनच हे अकाउंट हॅण्डल होत असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT