
Mumbai News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे, तर दुसऱ्या टप्प्याचे काम जानेवारी 2026 या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाआधी पूर्ण करून उद्घाटन करण्याचा प्रयत्न असणार आहे.
स्मारकाचं काम दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होईल. या स्मारकारच्या उद्घाटनावेळी कोणाला बोलवणार, यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "शिवसेनाप्रमुख हिंदूहृयसम्राट स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, त्यापेक्षा बाळासाहेबांचे कार्य जनतेपर्यंत पोचणे अधिक महत्त्वाचे आहे. स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याचे आव्हान होते. ते आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांनी योग्य जबाबदारी घेऊन ती पार पाडत आहे".
'हिंदूहृयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे 2022 मध्ये कामाचे भूमिपूजन केले. मात्र, त्यानंतर सरकार बदलले. आता 2026 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण होईल. उद्घाटनावेळी जे सरकार असेल, त्याचे ते श्रेय असेल. त्यावेळी जे पंतप्रधान असतील, त्यांना आमंत्रित करू. तसेच एनडीए (NDA) शिल्लक राहिली, तर त्यांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे', असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचा आराखडा पूर्ण केला आहे. यात बाळासाहेबांचा पूर्ण जीवनपट उलगडला जाणार आहे. त्यांची भाषणे, व्यंगचित्रे, गाजविलेल्या सभा, त्यांच्या वस्तू, दुर्मिळ फोटो, वाचनालय अशी सर्व माहिती तिथे असेल. काही बारकावे अजूनही बाकी आहेत. काही वस्तू कशापद्धतीने मांडायच्या यावर काम सुरू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईतील शिवाजीपार्क इथल्या जुन्या महापौर बंगल्याच्या परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करण्यात येत आहे. समुद्राशेजारील महापौर बंगला हा हेरिटेज वास्तू आहे. त्याच्या मूळ रचनेला धक्का न लावता स्मारक बांधण्याचे काम आव्हानात्मक आहे. समुद्राचे खारे पाणी किंवा वादळ, जोरदार वारा यांचा विचार करून बंगल्यात भूमिगत पद्धतीने बाळासाहेबांच्या स्मारकाची उभारणी होत आहे. बाळासाहेबांनी अनेक बैठका या महापौर बंगल्यात घेतल्या आहेत. त्यामुळे ही नुसती वास्तू नाही, तर बाळासाहेबांसाठी भावनात्मक बंधन आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.