Anil Parab Latest News
Anil Parab Latest News Sarkarnama
मुंबई

तब्बल १३ तासानंतर परबांची चौकशी संपली; ईडीने काही कागदपत्रे घेतली ताब्यात

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab)यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने आज सकाळ छापेमारी केली. अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू केले आहे. सकाळी सहा वाजता ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहचले होते. तब्बल १३ तासानंतर ईडीचे (ED) अधिकारी परब यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. (Anil Parab ED Raid news update)

अनिल देशमुख, नवाब मलिक, यांच्यानंतर ईडीने महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री असलेले अनिल परब यांच्यावर छापेमारी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच अनिल परब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे संजय कदम यांच्या घराबाहेरही शिवसैनिकांची गर्दी. संजय कदम यांच्या घरावरही सकाळपासून ईडीची कारवाई सुरू होती. या कारवाईच्या निषेधार्थ शिवसैनिक घराबाहेर जमून घोषणाबाजी करत आहेत. आयकर विभागानेही काही दिवसांपूर्वी कदम याच्या घरावर छापेमारी केली होती.

तब्बल १३ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांच्या बंगल्यावर चौकशी केली. ईडीचे अधिकारी तासिन सुलतान हे स्वत: या कारवाईत सहभागी झाले होते. अनिल परब यांच्या वांद्रे इथल्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. शिवसैनिकांच्या वतीने घराबाहेर घोषणाबाजी करण्यात येत आहे.

या कारवाईनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज छापे टाकलेले आहेत. गेल्या काही दिवसापासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कावारई होणार असे सांगितले जात होते. साई रिसॅार्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांनी न्यायालयात दावा केलेल आहे. हे सगळे असताना हे रिसॅार्ट चालू झालेले नाही. पर्यावरणाची दोन कलमे लावून रिसॅार्टचे पाणी समुद्रात जाते, अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे.

रिसॅर्ट चालू नसतानाही, माझ्यावर छापेमारीची कावारई केलेली आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेले आहेत. या पूर्वी देखील उत्तरे दिलेली आहेत. यापुढे देखील प्रश्न विचारले तरी उत्तरे देण्याची माझी तयारी. या सगळ्या चा खुलासा न्यायालयात होईल. प्रत्येक गोष्ट कायद्याला समोर ठेवून करत असतो. आजची जी चौकशी होती ती रिसॅार्टच्या संदर्भातील होती. मनी लॅंड्रींगच्या बाबतीत चौकशी नाही. ज्या वेळी रिपोट येतील तेव्हा त्यावर उत्तर देऊ. काही कागद पत्रे ताब्यात घेतली आहेत. छापे पडलेल्या लोकांचा रिसॅार्टशी काहीही संबंध नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT