मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री शिवसेनेचे (ShivSena) नेते अनिल परब (Anil Parab)यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने आज सकाळ छापेमारी केली. अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून (ED) धाडसत्र सुरू केले आहे. आज सकाळी सहा वाजता ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहचले. त्यावरुन भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकावर टीका केली आहे. (Kirit Somaiya Latest Marathi News)
किरीट सोमय्या म्हणाले, अनिल परब यांची बुकिंग नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यासोबत झालेली आहे. पुढचा नंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व श्रीधर पाटणकर यांचा आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे. दापोली रिसोर्टबाबत पहिली तक्रार आम्ही केली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी दापोलीला २०२१ मध्ये भेट दिली होती. त्यानंतर हा रिसॅार्ट पाडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
केंद्राने अनिल परब यांना रिसॅार्ट पाडण्यासाठी दिलेली मुदत संपलेली आहे, असेही सोमय्या म्हणाले. या रिसॅाटसाठी रोखीने २५ कोटी वापरले गेले. त्यातील ७ कोटी व्हाईट मनी दाखवले. मात्र, पैशांचा व्यवहार हा दाखवलेला नाही, असा दावा सोमय्या यांनी केला. यात परब यांचे जवळचे सदानंद कदम यांचाही जबाब नोंदवलेला आहे. रिसॅाटचे वीजबिल परब यांच्या नावाने असून ते बिल भरत आहेत.
ही प्रॅापर्टी २५ कोटीची नाही, असे ते म्हणतात, मात्र ही बेनामी प्रॅापर्टी आहे. या काळापैशाचा वापर रिसॅार्ट बांधण्यासाठी वापरला असून त्याबाबत तपास होणे गरजेचे आहे. हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. हा पैसा नेमका कुठून आला आहे. सचिन वाझेने दिलेला आहे की खरमाटेने यांची चौकशी व्हायला हवी. ही जागा सीआरझेडमध्ये असताना कागदपत्रात खाडाखोड करून जागेचा एनए मिळवला आहे.
त्यामुळे परब यांना विविध गुन्ह्यात अटक व्हायला हवी. ठाकरे सरकारने कोव्हिडमध्ये फक्त पैसे खाल्ले. ज्या दिवशी लॅाकडाऊन पंतप्रधानांनी घोषित केला त्या दिवशी परब यांना ३ फेज कनेक्शन मिळाले, असेही सोमय्या म्हणाले. परब यांना सीबीआयचाही सामना करावा लागणार आहे.
श्रीधर पाटणकरयाचे फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. यशवंत जाधव करोडो रुपये विमल अग्रवालच्या मदतीने कमवले ते परदेशात पाठवले. आदीत्य ठाकरे यांनी चतुर्वेदीच्या मदतीने भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.