ED Action Sarkarnama
मुंबई

'ईडी'च्या रडारवर आता तहसिलदार अन् सहायक निबंधकही

जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने अटक कलेले अॅड. सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक कलेले अॅड. सतीश उके (Satish Uke) आणि त्यांचे बंधू प्रदीप यांना बुधवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दोघांच्याही कोठडीत 11 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात आता तहसिलदार आणि सहायक निबंधकांचाही ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.

मनी लॉंडरिंग (Money Laundering) आणि जमीन बळकावल्या प्रकरणी उके बंधूंना ईडीने 31 मार्च रोजी अटक केली आहे. ते दोघेही सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांची कोठडीची मुदत संपत असल्याने दोघांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी ईडीने कोठडी आठ दिवस वाढवून मागितली होती. आरोपींचे लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त केले असून त्यातील डाटा तपासला जात आहे. तसेच काही कागदपत्रे, पुरावे तपासले जात आहे, असं ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आलं.

त्याचप्रमाणे तपासा दरम्यान ज्या दोन व्यक्तींचे खोटे मुखत्यारपत्र बनवले गेले, त्यांना चौकशीसाठी शुक्रवारी बोलावले आहे. या प्रकरणात संबंधित तहसीलदार आणि सहायक निबंधक यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यांना त्यांना सोमवारी (ता. 11) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही जण अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सतीश उके आधीपासून प्रकाशझोतात

दरम्यान, प्रदीप उके हे माजी पोलीस कर्मचारी असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयातील माजी न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले होते. तसेच उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये फडणवीस यांनी फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

जमीन प्रकरणात उकेंवर गुन्हा

काही दिवसांपूर्वी उके यांच्यावर एका 60 वर्षीय वृध्देने आपल्याला धमकावरून जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. उके यांनी दीड एक जमीन स्वत:च्या व भावाच्या नावावर केल्याचा आरोप वृध्देनं केला होता. काही वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी उके यांना ताब्यात घेतलं होते. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता ईडीने त्यांना अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT