दिल्लीत मोठी घडामोड : पंतप्रधान मोदी अन् शरद पवारांच्या भेटीनं चर्चांना उधाण

अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्याने राज्याचे राजकारण तापलं आहे.
Sharad Pawar News, Narendra Modi News, Sharad Pawar Meets PM Modi
Sharad Pawar News, Narendra Modi News, Sharad Pawar Meets PM ModiSarkarnama

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त केल्याने राज्याचे राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन नेते तुरूंगात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे लागलेला असतानाच दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Sharad Pawar Meets PM Modi)

संजय राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड ईडीने जप्त केले आहेत. एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीविरूध्द भाजप असा संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडी अजूनही काही नेत्यांची चौकशी सुरू आहे. सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडूनही तपास यंत्रणाना हाताशी धरून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आघाडीतील नेत्यांकडून केले जात आहेत.

Sharad Pawar News, Narendra Modi News, Sharad Pawar Meets PM Modi
दोन नाईकांमुळे भाजपच्या महाडिक-देशमुखांसमोर तगडं आव्हान

राज्यात या घडामोडी घडत असताना पवारांनी बुधवारी सकाळी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, राज्यातील घडामोडी, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई यांसह अन्य काही मुद्दांवर चर्चा झाल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या केवळ दोन दिवस आधी या दोन्ही सर्वोच्च नेत्यांमध्ये ही भेट झाली आहे. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात ही चर्चा झाली. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर प्रथमच दोन्ही नेते आज भेटले. यामुळे या भेटीचे राजकीय पडसाद उमटणे अपरिहार्य मानले जाते. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार पवार यांनी पंतप्रधानांची झालेल्या चर्चेत राज्याचेही काही प्रश्न मांडले आणि जीएसटी थकबाकी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह काही मुद्दे चर्चेत डोकावले असेही समजते.

Sharad Pawar News, Narendra Modi News, Sharad Pawar Meets PM Modi
केजरीवालांची पाठ फिरताच भाजपने 'आप'ला दिला मोठा दणका; 150 जणांची सोडचिठ्ठी

मागील वर्षी जुलै महिन्यात पवारांनी मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आठ महिन्यांनी दोन्ही नेते भेटले. या आठ महिन्यांत राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना ईडीने अटक केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य काही नेतेही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊतांसह इतरही नेत्यांची चौकशी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी भेट होत असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

पवारांच्या घरी सर्वपक्षीय नेत्यांचे स्नेहभोजन

पवार यांनी काल सर्वपक्षीय नेत्यांना स्नेहभोजनसाठी आमंत्रित केले होते. सर्वपक्षीय खासदार आणि आमदार पवार यांच्या निवासस्थानी जमले होते. त्यात त्यांच्या एका बाजूला संजय राऊत, तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बसल्याचे छायाचित्रावरून दिसते. दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनी दिल्ली गाठून राज्य सरकारच्या विरोधात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. या साऱ्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी या सर्वोच्च नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने दिल्ली दरबारात तो उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com