Ravindra Waikar Sarkarnama
मुंबई

ED News: ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ED ची छापेमारी

Ravindra Waikar News: सकाळी साडेसात वाजेपासून ईडीचे ८ ते १० अधिकारी वायकर यांच्या घरी व कार्यालयात तपासणी करीत आहेत.

Mangesh Mahale

Mumbai News: ठाकरे गटाचे नेते, आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. आज (मंगळवारी) सकाळी साडेसात वाजेपासून ईडीचे ८ ते १० अधिकारी वायकर यांच्या घरी व कार्यालयात तपासणी करीत आहेत. त्यांचे भागीदार असलेल्या व्यक्तींच्या घरी व कार्यालयातही ईडीची अधिकारी चौकशी करीत आहेत.

जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. एकूण ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. भूखंडाचा गैरवापर तसेच तथ्य लपवून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास परवानगी मिळवल्याचा आरोप ईडीने केला आहे.

रवींद्र वायकर यांच्याविरोधात यापूर्वी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांच्यावर बेकायदेशीरपणे हॉटेल बांधल्याचा आरोप आहे. जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप आहे. हा 500 कोटींचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी वायकर यांना ईडीकडून चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ईडीच्या इकनॉमिक ऑफेन्स विंगने यापूर्वी वायकर यांची चौकशी केली होती. आता ईडीने वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ईडीने या पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रे मागवली आहे.

कर नाही त्याला डर कशाला- मुख्यमंत्री

"कुठल्याही प्रकारच्या राजकीय सुडापोटी वायकर यांच्यावर ही कारवाई केलीली नाही, तपास यंत्रणांच्या चौकशीची तो भाग आहे. कर नाही त्याला डर कशाला? लवकरच सत्य बाहेर पडेल," असे या कारवाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT