NCP News: 'जशास तसं उत्तर' कसं द्यायचं यासाठी अजित पवार गट सज्ज !

Ajit Pawar News: अजित पवार गटाकडून प्रवक्त्यांची आज बैठक
Sharad pawar, Ajit pawar
Sharad pawar, Ajit pawar Sarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव

Mumbai News: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट झाले आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. नेत्यांमध्ये देखील भाषणातून टीका केली जाते. आता शरद पवार गटाला जशास तसं उत्तर देण्यासाठी अजित पवार गट सज्ज झाला आहे.

अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर काहींनी मंत्रिपदाची. त्यांनी बंडखोरी केल्यावर त्यांच्यावर शरद पवार गटाकडून टीका करण्यात आली. अजित पवार गटाकडून देखील शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली. दोन्ही नेत्यांकडून टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यासाठी आता अजित पवार गटाकडून प्रवक्त्यांची बैठक आज बोलावण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या गटावर टीका केली जात आहे. त्याला अजित पवार यांच्या गटाकडून फारस कोणी उत्तर देत नाही, मात्र आता शरद पवार गटाला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांच्या गटातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रवक्त्यांची बैठक आज बोलावली आहे. प्रवक्त्यांनी कशा पद्धतीने उत्तर द्यायचं यासाठी त्यांचं मार्गदर्शन केलं जाऊ शकतं.

Sharad pawar, Ajit pawar
Sangli Lok Sabha Seat : सांगली लोकसभा काँग्रेसकडेच; चव्हाणांनी उमेदवारही केला जाहीर!

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात जाहीर रित्या सांगितलं होत की जशास तसं उत्तर द्या, त्यामुळे आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून हे आदेश आल्यावर आता त्यांच्या गटातील प्रवक्ते निश्चित जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार असतील. त्यामुळे आजची ही बैठक त्यांच्यासाठी महत्वाची मानली जात आहे.

शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका देखील अजित पवार हे वारंवार त्यांच्या भाषणातून करताना दिसतात. त्याला उत्तर देखील शरद पवार गटाकडून दिलं जातं, खासदार सुप्रिया सुळे त्यांना उत्तर देतात, मात्र कार्यकर्त्यांमध्ये देखील हा आक्रोश पाहायला मिळतो. समोरच्या गटाच्या नेत्याबद्दल टीका करणं, त्यांची जुनी प्रकरण बाहेर काढणं, हे सगळं आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सुरू झालं आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी जाण्याची भूमिका घेतली. तर शरद पवार यांनी विरोधातच राहण्याचं ठरवलं. मागील काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. अनेकदा दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून विशेष तयारी प्रवक्त्यांकडून केली जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

Sharad pawar, Ajit pawar
Tanaji Sawant News : मंत्री तानाजी सांवत आमदारांचा निधी वापरून 'ट्रान्सफार्मर बँक' उभी करणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com