Eknath Khadase on NCP : "राज्यात हिंदुत्त्वाचं चित्र उभं केलं जात आहे. पण राज्यात महागाई, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींपासून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाई वाढत चालली आहे, पण पंतप्रधान त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. या देशात मणिपूरमध्ये जो हिंसाचार माजला आहे, त्यावर पंतप्रधान बोलायला तयार नाही." अशी टिका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Ekanath Khadase) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) वर्धापनदिन नुकताच पार पडला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर सडेतोड भूमिका मांडली आहे. ''राज्यात महागाई, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींपासून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाई वाढत चालली आहे पण पंतप्रधान त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत, याकडे खडसेंनी लक्ष वेधलं आहे.
''या देशात मणिपूरमध्ये जो हिंसाचार माजला आहे, त्यावर पंतप्रधान बोलायला तयार नाही. राज्यात देवेंद्रजीही त्यावर भाष्य करायला तयार नाहीत. 'राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र', अशी भूमिका घेऊन चालतात जसे काय आम्ही अमरत्व घेऊन आलो आहोत.'' अशी टिका खडसेंनी यावेळी केली.
इकडून कुणी एखादा शब्द वापरला की दुसरीकडून दुसरा शब्द येतो. या राजकारणाच्या दृष्टीकोनातून जे चाललं आहे ते त्यांना आवडत नाही. जे शब्द वापरले जातात ते योग्य नाही. अशा स्थितीत देशाचं जे चित्र आहे ते 'सीडी'चं नाही तर 'ईडी'चं चित्र आहे. भिती घालायची ब्लॅकमेल करायचं नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा. असं दहशतीचं आणि भितीचं वातावरण राज्यात आणि देशात सुरु असल्याचा घणाघात खडसेंनी केला.
'या आव्हानांना सामोरे जाऊन राष्ट्रवादीचे देशात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात एक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितच पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, हे सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरच होऊ शकतं, असंही त्यांनी नमुद केलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.