Eknath Khadse News  Sarkarnama
मुंबई

Eknath Khadse News : अटकेविना नियमित जामीन मिळणारे खडसे हे एकमेव माजी मंत्री; मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा

Bombay Sessions Court : एकनाथ खडसेंना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Mangesh Mahale

Pune : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी विशेष न्यायालयाने नियमित जामीन मंजूर करून खडसेंना मोठा दिलासा दिला. यापूर्वी आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांना अटक होऊन जामीन मिळाला आहे. अटकेविना नियमित जामीन मिळणारे खडसे हे एकमेव माजी मंत्री आहेत.

PMLA अंतर्गत मनी लॉंड्रिंग केल्याचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करण्यात आला होता, तर यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना नियमित जामीन मंजूर केला गेला आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला होता. खडसेंना सशर्त हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ईडीने दाखल केलेला गुन्हा हा चुकीचा असल्याचा युक्तिवाद खडसे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी सत्र न्यायालयात केला. एकनाथ खडसे यांनी ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य केल्याचंदेखील या वेळी वकील मोहन टेकावडे यांनी न्यायालयात सांगितले.

आरोप हे राजकीय हेतूने केल्याचा दावाही खडसे यांच्यातर्फे जामिनाची मागणी करताना केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी खडसे यांची नियमित जामिनाची मागणी मान्य करून त्यांना दोन लाखांच्या वैयक्तिक मुचलक्यावर आणि तेवढ्याच हमीवर जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण

भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड खरेदीत तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सुमारे ३१ कोटी रुपयांचा हा भूखंड खडसे यांचे जावई गिरीश चौधरी आणि त्यांच्या पत्नी यांनी अवघ्या ३.७ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी चौधरी यांना दीड वर्षापूर्वी ईडीने अटक केली हाेती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT