Nana Patole, Ashish Deshmukh
Nana Patole, Ashish Deshmukh Sarkarnama

Ashish Deshmukh News : नेते, हायकमांड पटोलेंना गांभीर्याने घेत नव्हते, आता कार्यकर्तेही ऐकत नाहीत; देशमुखांचा टोला

Maharashtra Politics : काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचे ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत न बोललेले बरं," असे देशमुख म्हणाले.
Published on

Mumbai : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. पटोलेंनी पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे न ऐकता पदाधिकारी एकमेकांना भिडले. पटोलेंच्या समोरच पदाधिकारी त्यांचे ऐकत नाहीत, यावरून भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी पटोलेंना चिमटा घेतला आहे.

"नेते आणि हायकमांड पटोलेंना आजपर्यंत गांभीर्याने घेत नव्हते, आता एखादा लहानसा कार्यकर्तादेखील नाना पटोले यांना गांभीर्याने घेत नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचे ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत न बोललेले बरं," असे देशमुख म्हणाले.

Nana Patole, Ashish Deshmukh
Supriya Sule News : फडणवीसांचा पोलिसांवर भरवसा नाय का? कंत्राटी पोलिस नेमण्याचा आदेश कुणाचा खिसा गरम करणार...

मराठा समाज आरक्षणावर देशमुख म्हणाले, "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे सरकार आल्यावर ते हे आरक्षण टिकवू शकले नाही. ठाकरे सरकारने आरक्षणाची बाजू न्यायालयात योग्य मांडली नाही. त्यामुळे आरक्षण गमवावे लागले. मात्र, आता एकनाथ शिंदे यांचे सरकार मराठा समाजाला टिकावू आरक्षण देईल. त्यात ओबीसी समाजाचा कुठेही टक्का कमी होणार नाही," असे देशमुख म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वच पक्ष ठाम आहेत. ओबीसींचा टक्का कमी न होता मराठा आरक्षण मिळावे, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. मनोज जरांगे पाटलांनी सावधपणे विधाने करावेत, असा सल्ला देशमुखांनी त्यांना दिला.

Nana Patole, Ashish Deshmukh
Congress News : पटोले थोरातांच्या समोरच म्हणाले, 'नाराजीचं एक तरी पत्र दाखवा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com