Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यामध्ये खलबतं

Devendra Fadnavis, Ajit Pawar : पंतप्रधान मोदींचा दौरा आणि मनोज जरांगेंच्या आंदोनाबाबत चर्चा ?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यातील सत्तासंघर्षावर बुधवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. या निकालाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या शासकीय निवासस्थान वर्षावर बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली आहे. यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह पोलिस महासंचालकही उपस्थित होते. त्यामुळे निकालाआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेनुसार शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल बुधवारी लागणार आहे. या प्रकरणी दहा महिने सुनावणी होऊन पाचशे पानांचे निकालपत्र तयार करण्यात आले आहे. या निकालपत्राचे बुधवारी फक्त वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, निकाल तीन दिवसांवर आला असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. यावर ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतला असून सुप्रीम कोर्टात अर्जही दाखल केला आहे. तसेच अध्यक्षांच्या निष्पक्षपणावर संशयही व्यक्त केल्याने निकालापूर्वीच शिंदे आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला गेला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशीही चर्चा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर तोडगा काढण्यासाठीही बैठक बोलावल्याचे सांगण्यात येते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT