Dnyanraj Chougule : 'मी लोकसभेसाठी इच्छुक नाही हो!'; आमदार चौगुलेंनी स्पष्टच सांगितले

Dharashiv Shivsena : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटात चढाओढ
Dnyanraj Chougule
Dnyanraj ChouguleSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राजकारणात आपले नाव चर्चेत राहावे, विशेषतः निवडणुका असतील तर इच्छुक म्हणून आपल्या नावाची चर्चा व्हावी, यासाठी अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी उत्सुक असतात. पण लोकसभा निवडणुक जवळ आलेली असताना एका आमदाराचे इच्छुक म्हणून नाव पुढे येताच त्याने चक्क मी लोकसभेसाठी इच्छूक नाही हो... असे म्हणत इच्छूकांमध्ये आपले नाव नको ? असे आवाहन केले. ते आमदार दुसरे-तिसरे कोणी नसून शिवसेना शिंदे गटाचे उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आहेत.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटात स्पर्धा लागली आहे. माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत हे या स्पर्धेत आघाडीवर आहेत. या दोघांच्या नावावर चर्चा सुरू असतांना अचानक आमदार ज्ञानराज चौगुले हेही धाराशिव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता आपल्या उमेदवारीचा दावा मजबूत व्हावा यासाठी ही कांडी पिकवण्यात आल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Dnyanraj Chougule
MLA Disqualification Case : मोठी बातमी! आमदार अपात्रतेचा निकालापूर्वीच ठाकरे गट नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात

आता ही चर्चा कोणी सुरू केली? हे जिल्ह्यातील चाणाक्ष जनतेला कळाले नसते तर नवलच. उमेदवारीसाठी आपला दावा मजबूत करण्यासाठी तिसऱ्याचीच चर्चा घडवून आणण्याचा हा डाव आमदार चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी वेळीच ओळखला. आपला बळीचा बकरा होऊ नये, यासाठी ज्ञानराज चौगुले यांनी तातडीने प्रसिद्धीपत्रक काढत येणाऱ्या बातम्या आणि त्यातून आपल लोकसभेसाठी इच्छूक आहोत, असा दावा सपशेल खोटा असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मी जिल्ह्याच्या राजकारणात हस्तक्षेप करत नाही, फक्त विकासाच्या दृष्टीने राबविल्या जाणाऱ्या धोरणांकडेच माझे लक्ष असते. माझ्या विधानसभा मतदारसंघातील विकासकामाकडेच माझे कायम लक्ष असते. आमदार म्हणून मी समाधानीही आहे. त्यामुळे माझे राजकीय गुरू माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशीच माझी इच्छा आणि प्रयत्न असल्याचे चौगुले यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील शिवसेनाही त्यांच्याच पाठीशी आहे. त्यामुळे मी लोकसभा लढवण्याचा किंवा तशी इच्छा व्यक्त करण्याचा प्रश्नच नाही', असे ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) स्पष्टीकरण दिले.

रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालीच मी पंधरा वर्षापासून काम करत आहे. उमरगा-लोहारा मतदारसंघातील विकासकामासाठी निधीही खेचून आणला आहे. अनेक विकासकामेही प्रगतीपथावर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह संपुर्ण मंत्रीमंडळाचे मला सहकार्य मिळत असल्याचे ज्ञानराज चौगुले यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे कांड्या पिकवणाऱ्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Dnyanraj Chougule
Crop Insurance : पीकविमा कंपनीस झटका; शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार मोठी रक्कम जमा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com