Delhi meeting updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत कोणता निर्णय होतोय, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. पण सध्या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अस्वस्थता वाढलेली दिसते.
एकनाथ शिंदे यांनी पुन्हा अचानक दिल्ली दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तब्बल 90 मिनिटं चर्चा केली. या चर्चेमधील तपशील आता हळूहळू बाहेर येऊ लागला आहे. यात प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या गठबंधनासह महाराष्ट्रातील भाजपकडून कार्यक्षेत्रात होत असलेल्या मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडले.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गेल्या सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची ही चौथी वेळ आहे. या चौथ्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. ते म्हणजे, या दोघांमध्ये तब्बल 90 मिनिटं चर्चा झाली. या भेटीतून नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यासाठी एकनाथ शिंदे किती आवश्यक आहे, याचा सूचक संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषणकांचे म्हणणे आहे.
या भेटीत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा बालेकिल्ला ठाणे जिल्ह्यात भाजपचे (BJP) मंत्री गणेश नाईक यांचा वाढता हस्तक्षेपावर आणि पुण्यातील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मुद्यावर चर्चा केल्याची माहिती आहे. गणेश नाईक ठाण्यात शिवसेनेवर वर्चस्व गाजवत आहे, त्यावर तीव्र शब्दात शिंदेंनी पंतप्रधान मोंदीकडे नाराजी व्यक्त केली.
राज्यात सध्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जमीन घोटाळा गाजत आहे. या शिवसेनेचे पुण्यातील स्थानिक नेते रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक आहे. एक-एक पुरावे बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. या प्रकरणावर चर्चा करताना, पक्षाची त्यांनी भूमिका पंतप्रधान मोदींसमोर स्पष्ट केली आहे. तसंच वेळप्रसंगी या प्रकरणात आपण हस्तक्षेप करणार असल्याचेही संकेत एकनाथ शिंदेंनी दिले.
विकास कामांना मिळत असलेल्या निधीत देखील कात्री लागल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पूर्वी इतका निधी शिवसेना मंत्री आणि आमदारांना मिळत नसल्याचे तक्रार एकनाथ शिंदेंनी केली आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्राउंड रिपोर्ट काय आहे, याचा अहवाल देखील एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान यांना दिला.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीत महायुतीमधून सन्मानपूर्वक आणि सम-समान जागा वाटपावर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत जोर दिला आहे. या भेटीविषयी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ही भेट पुढे काय राजकीय रंग उधळते, याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.