PSI Vijay Sangde death Sarkarnama
मुंबई

PSI Vijay Sangde death : एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील पोलीस उपनिरीक्षकाचे निधन; ड्युटीवर असतानाच आली चक्कर

Eknath Shinde escort PSI death, Eknath Shinde escort team : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विजय सांगडे यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कामावर आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना चक्कर आली.

Rajanand More

Maharashtra Police news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांचे सोमवारी निधन झाले. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात सकाळी कामावर आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना चक्कर आली. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केला. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

PSI सांगडे हे ५७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सांगडे कुटुंबियांसह दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सांगडे यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे. सांगडे हे मागील तीन वर्षांपासून एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत होते.

सांगडे हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शासकीय विश्रामगृहात ड्युटीवर आले. त्यानंतर त्यांना अचानक छातीत दुखू लागले. तिथेच चक्करही आली. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

उपचार सुरू असतानाच सांगडे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले. त्यांना ठाण्यातील सिव्हील रुग्णालय परिसरातच पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.

सांगडे हे डोंबिवलीच्या पलावा सिटी मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांचे पार्थिव जून्नर येथील मूळ गावी नेण्यात येणार असल्याचे समजते. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT