Defamation case update : मोदी सरकारमधील माजी अर्थ सचिवांवर भाजप खासदारानेच ठोकला मानहानीचा दावा; म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था बुडविणाऱ्या...

Nishikant Dubey defamation case, Subhash Chandra Garg, former finance secretary : ती व्यक्ती खोटं बोलत असलयाने मी मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याने सार्वजनिकरित्या माफी मागितली नाही तर तुरुंगात जावे लागेल, असेही निशिकांत दुबे म्हणाले आहेत.
BJP MP Nishikant Dubey has filed a defamation case against former Finance Secretary Subhash Chandra Garg.
BJP MP Nishikant Dubey has filed a defamation case against former Finance Secretary Subhash Chandra Garg.Sarkarnama
Published on
Updated on

Former finance secretary news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अर्ज सचिव म्हणून निवृत्त झालेल्या सुभाष चंद्र गर्ग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे. आपल्याबाबतीत चुकीची विधाने केल्याचे दुबेंनी म्हटले आहे. विशेष म्हणजे गर्ग यांनी काही दिवसांपूर्वीच देशाचा जीडीपी आणि सरकारी धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते.

माजी अर्थ सचिव असलेल्या गर्ग यांनी सरकारकडून जाहीर करण्यात आलेला जीडीपी चुकीचा असल्याचे दावा केला होता. त्यावरून देशभरात राजकारण तापले होते. गर्ग यांचा दावा सरकारसह काही अर्थतज्ज्ञांनीही खोडून काढला होता. हेच गर्ग आता कायदेशीर लढ्यात अडकले असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

खासदार दुबे यांनी गर्ग यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत म्हटले की, ती एक क्षुद्र मनोवृत्तीची व्यक्ती आहे. २०१८ मध्ये मी त्याच्या कार्यालयात गेलो होतो, असे तो सांगतो. दिल्ली किंवा रांची येथे मी कधी कोणत्याही सचिवांच्या कार्यालयात गेलो असेल तर त्याने सिध्द करून दाखवावे. मी त्याला आव्हान देतो.

BJP MP Nishikant Dubey has filed a defamation case against former Finance Secretary Subhash Chandra Garg.
Local Body Elections : काँग्रेसला सर्वाधिक जागा, पण निवडणूक न लढताही भाजप नेता बनला नगराध्यक्ष; नेमकं काय घडलं?

मी कधीही बदली किंवा नियुक्तीसाठी पत्र लिहिले नसल्याचे सांगत दुबे यांनी गर्ग यांचा दावा फेटाळून लावला. असे कोणतेही एक पत्र दाखवून द्यावे. ज्या कालावधीचा तो दावा करत आहे, त्यावेळी मी सार्वजनिक लेखा समितीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर विषयांचा अध्यक्ष होतो. समितीचे अध्यक्ष कोणत्याही सचिवाला किंवा अधिकाऱ्याला बोलवू शकतात, असे दुबे म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था बुडविणाऱ्या सुभाषचा रस्त जेल असल्याचेही दुबेंनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

BJP MP Nishikant Dubey has filed a defamation case against former Finance Secretary Subhash Chandra Garg.
Supreme Court news : शिवसेना प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाने वाढली धडधड; मतदारांचा मुद्दा ठरणार महत्वाचा, नेमका अर्थ काय?

ती व्यक्ती खोटं बोलत असलयाने मी मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याने सार्वजनिकरित्या माफी मागितली नाही तर तुरुंगात जावे लागेल, असेही दुबे म्हणाले आहेत. दरम्यान, गर्ग हे मार्च २०१९ मध्ये अर्थ सचिव म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर सुमारे चार महिन्यांतच त्यांची ऊर्जा मंत्रालयात बदली झाली. या बदलीनंतर लगेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते ऑक्टोबर २०२० मध्ये नियमितपणे सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची बरीच चर्चा झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com