मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून शिंदे सरकारमधील खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे १८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात (center government) शिंदे गटाला संधी मिळणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा दुसरा फेरबदल असणार आहे.
या फेरबदलात महाराष्ट्रातील शिंदे गटाला स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. ज्या राज्यांत २०२२-२३ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत त्या राज्यांतील सदस्यांना संधी दिली जाऊ शकते. शिंदे गटातून कुणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याची चर्चा सध्या रंगली आहे. बिहारमधून जदयू कोट्यातून नवा चेहरा दिला जाणार आहे. यासाठी शिंदे गटाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 'दिव्य मराठी'ने हे वृत्त दिले आहे.
शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे.विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Assembly Speaker Election) महाविकास आघाडीकडून राजन साळवी (Rajan Salvi) यांनी आज अर्ज भरला. भाजपकडून (bjp) कुलाब्याचे तरुण आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.