विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : आघाडीचा उमेदवार ठरला ; नार्वेकर विरुद्ध साळवी सामना रंगणार

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे.
Assembly Speaker Election
Assembly Speaker Electionsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Assembly Speaker Election) महाविकास आघाडीकडून राजन साळवी (Rajan Salvi) यांनी आज अर्ज भरला. यावेळी बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. साळवी हे राजापूरचे शिवसेनेचे आमदार आहे. काल राहुल नार्वेकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. (Assembly Speaker Election news)

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. ३ जुलै रोजी पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. भाजपकडून (bjp) कुलाब्याचे तरुण आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Assembly Speaker Election
श्रीधर पाटणकरांना 'क्लिनचीट' : ठाकरे-भाजपमध्ये दिलजमाई ?

भाजपचे १०६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार यामुळे नार्वेकरांचा विषय सोपा मानला जात आहे. राहुल नार्वेकर हे सध्या केवळ ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. शिवाय ते निष्णात वकील देखील मानले जातात.

या सोबतच नार्वेकर विजयी झाल्यास सासरे विधानपरिषदेचे सभापती अन् जावई विधानसभेचे अध्यक्ष असे चित्र निर्माण होणार आहे. नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. नार्वेकरांचे बंधू अ‍ॅड. मकरंद नार्वेकर हे कुलाब्यातूनच भाजपचे नगरसेवक होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com