Eknath Shinde-Pratap Sarnaik Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचे मध्यरात्री खलबतं, सगळ्या चर्चांना पूर्णविराम! सरनाईक, म्हस्केंवर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Mahayuti Thane Election : एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी रणनीती तयार केली असून खासदार नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Eknath Shinde News : ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातीलर राजकारण एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा आहे. ठाण्यात भाजपकडून शिंदेंसोबत न जाण्याचा राग आळवला असता तरी वरिष्ठांनी शिंदेंसोबत युती होणार हा निर्णय घेतला आहे. आता एकनाथ शिंदेनी देखील आपल्या पक्षातील नेत्यांवर जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत.

ठाणे जिल्हा व परिसरातील सर्व प्रमुख महापालिकांबाबत सविस्तर चर्चा व बैठक मंगळवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख्य नेत्यांची घेतली. या बैठकीत ठाण्यातील मेळाव्यानंतर झालेल्या या बैठकीला प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, गोपाळ लांडगे, हेमंत पवार, विजय चौघुले यांच्यासह शिंदे सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ठाणे महापालिकेची जबाबदारी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. मीरा भाईंदर महापालिकेची जबाबदारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेसाठी देखील खासदार नरेश म्हस्के हे शिंदे सेनेच्या वतीने नेतृत्व करणार आहेत. तर वसई विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक हे भाजपसोबत चर्चा व समन्वय साधणार आहेत. या निर्णयानंतर आजपासून स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू होणार असून, त्या-त्या महापालिका क्षेत्रात जागावाटप, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांची मते आणि निवडणूक रणनीती यावर सखोल चर्चा केली जाणार आहे.

... तर शिंदे, फडणवीस हस्तक्षेप करणार

महायुतीतील जागावाटपात किंवा स्थानिक पातळीवर काही अडचणी निर्माण झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण हे स्वत: लक्ष घालून तोडगा काढणार असल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पालिका निवडणुकांच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आत्तापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT