Eknath Shinde News  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : अयोध्येत 'एकनाथां'चा बोलबाला; बॅनरबाजी करीत शिंदेशाहीची अनोखी झलक!

Eknath Shinde In Ayodhya : अयोध्येकडे जाणाऱ्या मार्गावर 'शिंदेशाही'ची झलक...

सरकारनांमा ब्यूरो

पंकज रोडेकर -

Thane News : करोडो हिंदूंच्या नजरा आता अयोध्येतील मंदिरामधील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे लागून राहिल्या आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. अशातच अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलबाला पाहण्यास मिळत आहे. ठाणेकर असलेले विकास दाभाडे, तसेच बाला आणि रीना मुदलियार या दाम्पत्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतार्ह अयोध्येतील मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख 36 नाक्यांवर बॅनरबाजी करीत शिंदेशाहीची जणू एक झलक अयोध्यावासीयांना करून दिली आहे. (Latest Marathi News)

सुमारे 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारले गेले आहे. या मंदिरातील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होत आहे, याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे.

याच राम मंदिर याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तर या सोहळ्यानिमित्त राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. अशाप्रकारे ठाणेकर नागरिक अयोध्येत पोहोचले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतार्ह तयारी सुरू करीत एक-दोन नाही तर तीन डझन म्हणजे 36 बॅनर्स लावण्यात आले आहेत.

हे बॅनर्स श्रीरामनगरी अयोध्येत स्वागत करणार असून त्याच्यावर अयोध्येतील मंदिरासह प्रभू श्रीराम हे धनुर्धारी आहेत, असे प्रतिमा पाहण्यास मिळत आहे, तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अजित पवार यांच्या छायाचित्रासह शिंदे पिता-पुत्रांचेही त्याच्यावर छायाचित्र पाहण्यास मिळत आहे. यानिमित्ताने ठाणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिंदेशाहीची अनोखी झलक अयोध्येत पाहण्यास मिळू लागलेली आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे सुपुत्र असल्याने, त्यांचे अयोध्येत आगमन होताना स्वागत झाले पाहिजे, म्हणून हा खटाटोप असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT