Eknath Shinde, Milind Narvekar
Eknath Shinde, Milind Narvekar sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंचे 'आनंद दिघे' यांच्या घरी एकनाथ शिंदेंची धडक

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) सचिव व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मात्र, नार्वेकर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. तसेच 'मातोश्री'च्या वर्तुळात त्यांना विशेष महत्त्व आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सुरतमध्ये गेले होते. तेव्हा शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांनाच पाठवले होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नार्वेकरही त्यांच्या सोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. त्यावर नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले होते. मी उद्धव ठाकरे यांचा 'आनंद दिघे' आहे असे सांगत त्यांनी आपण शिवसेने सोबतच असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आजच्या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT