Ekanth Shinde : Raju Patil Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News: राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसेचे एकमेव आमदार अन् मुख्यमंत्र्यांनी साधला मुहूर्त; म्हणाले..

Ekanth Shinde Meets Raju Patil : शिवसेना-मनसे एकत्र येण्याची चर्चा...

सरकारनामा ब्यूरो

Gudi Padva Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पक्षाच्या प्रथेप्रमाणे गढीपाडवा सभा शिवाजी पार्क येथे होत आहे. या सभेकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र या सभेपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे पक्ष कार्यालयाला भेट दिली आहे. यामुळे मनसेच्या या सभेसंदर्भात राजकीय विश्वात चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे या सभेतून महाराष्ट्राच्या सद्यस्थितीच्या राजकारणावर, महाराष्ट्रातील सत्तांतर, न्यायालयाच्या दारी गेलेला सत्तासंघर्ष आणि मुख्य म्हणजे मशिदीवरील भोंगे या मुद्द्याव भाष्य करतील, अशी शक्यता आहे. या सभेकजे राज्याबरोबरच देशाचेही लक्ष लागलेले आहे.

सायंकाळी राज यांची सभा होत आहे, तर सभेपूर्वीच मुख्य़मंत्री शिंदे यांनी मनसेच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली आहे. डोंबिवलीतील मनसेच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात शिंदेंनी हजेरी लावली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या भेटीमुळे शिंदे यांची शिवसेना आणि मनसेच्या एकत्र येण्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

यासंदर्भात बोलताना कल्याण ग्रामीण मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "युती किंवा इतर गोष्टींच्या सदर्भात आमचे नेते व पक्षप्रमुख राज ठाकरे हेच काय ते निर्णय घेतील. मुख्यमंत्री शिंदे या भागात एका गणपती संस्थानच्य सोहळ्यासाठी आले होते. यानिमित्ताने त्यांची भेट झाली. त्यांना मी आमच्या कार्यालयात येण्यासठी निमंत्रित केले. मोठ्या मनाने त्यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट दिली, असे आमदार पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT