Amritpal Singh News: फरार खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग महाराष्ट्रात? तपास यंत्रणा सतर्क !

Punjab News : तपास यंत्रणांचे धागेदोरे...
Punjab News :  Amritpal Singh
Punjab News : Amritpal SinghSarkarnama
Published on
Updated on

Amritpal Singh in Maharashtra : पोलीस ज्याचा शोध घेत आहेत तो खलिस्तानी समर्थक आणि वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग हा महाराष्ट्र राज्यात आश्रयाला आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्था सतर्क झाल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून अमृतपालचा शोधघेण्याचा प्रयत्न पंजाब पोलीस करत आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांकडून समजत आहे की, आतंकी हरविंदर रिंदा याच्यासोबत अमृतपालसोबत संबंध आढळून आल्याचा दावा केला जात आहे. पंजाब राज्यापासून ते महाराष्ट्रापर्यंत रिंदा नेटवर्क असल्याचे बोलले जाते. आतंकी कारवायांसाठीच रिंदासोबत अमृतपालचं कनेक्शन जुळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

Punjab News :  Amritpal Singh
Punjab Police : अमृतपाल सिंगचे सात फोटो, दोन video व्हायरल ; क्लीन शेव-दाढी-पगडीमधील..

खलिस्तानची मागणी करणारा पंजाबचा कट्टरपंथी अमृतपाल महाराष्ट्रातील ड्रग्स पेडलर्सच्या आश्रयाला आल्याची माहिती आहे. 'अमर उजाला'ने याबाबतचे वृत्त सूत्रांच्या हवल्याने दिले आहे. अमृतपालचे संबंध, त्याचं नेटवर्क आणि इतर माध्यमांमधून गुप्तचर यंत्रणांना लिंक मिळत आहेत.

सूत्रांच्या प्राप्त माहितीनुसार, आयएसआय नेटवर्कची मदत घेऊन अमृतपाल महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषेपर्यंत पोहोचला. पाकिस्तान देशाच्या इशाऱ्यावर भारतात अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांच्या आश्रयात अमृतपाल असल्याची माहिती आहे.

Punjab News :  Amritpal Singh
Punjab News: खलिस्तानी समर्थक अमृतपालविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी ; पोलिसांची शोधाशोध सुरूच!

गुप्तचर यंत्रणा सद्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड ते मुंबई या भागात शोध आणि तपास करत आहे. पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या सूत्र हाकणाऱ्या आणि अमली पदार्थांचा देशात पुरवठा करणाऱ्या हरिवंदर सिंह रिंदा याची अमृतपालला साहाय्य होत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या माहितील अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र अमृतपाल सिंग महाराष्ट्रात गेल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com